समीर वानखेडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकवर्गात समाधानाचे वातावरण

रिया चक्रवर्ती, आर्यन खान यांच्यासमवेत बड्या व्यक्तींच्या घरातील लोकांना जेलमध्ये पाठवणारे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची दमदार कामगिरी.

मुंबई ( बारामती झटका )

रिया चक्रवर्ती, आर्यन खान यांच्यासमवेत अनेक बड्या घराण्यातील व्यक्तींना जेलची हवा दिलेली असल्याने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समीर वानखेडे यांनी दमदार कारवाई केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशामध्ये चर्चा झालेली होती. समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत राजकीय मंडळींनी टीका करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केलेली होती परंतु, न डगमगता धैर्याने व धीराने समीर वानखेडे यांनी साम, दाम, दंड, भेदाने सर्वांना सामोरे जाऊन जोमाने कारवाई सुरू केलेली आहे. मुंबई येथील कार्यालयात बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत राजाराम मगर पाटील पेट्रोलियमचे सर्वेसर्वा उद्योजक लक्ष्मणराव मगर पाटील, प्रगतशील बागायतदार बाळासाहेब मगर पाटील, गणेश देशमुख, अनील माने आदी उपस्थित होते.

समीर वानखेडे यांचा जन्म दि. १४ डिसेंबर १९७९ साली दलित परिवारामध्ये झालेला होता. त्यांचे वडील दयानंद देव वानखेडे रिटायर्ड पोलिस ऑफिसर आहेत. आई जोहदा उत्कृष्ट गृहिणी आहेत तर, बहिण यासमीन क्रिमिनल वकील आहेत. समीर वानखेडे यांनी २००८ मध्ये लोकसेवा आयोग यूपीएससी सिव्हील सर्विस परीक्षा पास झालेले होते. त्यांनी इंडियन सर्विसेस मुंबई येथे सेवा केली होती. इन्कम टॅक्स इटेनीलीजेस युनिट नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अहम पदावर जबाबदारी सांभाळलेली होती. ४२ वर्षाचे समीर वानखेडे यांनी हिस्टरी विषयातून पदवी मिळवलेली होती.
२०१० मध्ये महाराष्ट्र सर्विस टॅक्स विभागांमध्ये काम करीत असताना टॅक्स चोरी करणाऱ्या २५०० लोकांवर कारवाई केली होती. त्यामध्ये दोनशेपेक्षा ज्यादा बॉलिवूडमधील लोक सहभागी होते. तसेच त्यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींच्या घरातील लोकही होते. त्यावेळेला ८७ करोड रुपये महसूल जमा करून शासनास फायदा केलेला होता. मुंबई एअरपोर्टवर नोकरीस असताना अनेक मोठे मासे गळाला लावले होते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम सोन्याचा वर्ल्डकप घेवून मुंबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर कस्टम ड्युटी भरण्याकरता सर्वांना अडवले होते. कस्टम ड्युटी भरल्यानंतर सर्वांना सोडून दिले होते.

रिया चक्रवर्ती, आर्यन खान यांच्यावर कारवाई केल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करून पर्सनल लाईफवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशा सर्व परिस्थितीत समीर वानखेडे लढत असल्याने ग्रामीण भागांमधील मुले आपले करियर बनवण्याकरता शहरी भागात येत असतात, अशा वेळेला फिल्म इंडस्ट्री, उद्योग-व्यवसाय, मोठमोठ्या राजकीय व्यक्तींची मुले अशा गैर गोष्टीत ग्रामीण भागातील मुलांना अडकवून त्यांचे करियर उध्वस्त करीत असतात. अशा गोष्टींना आळा घालण्याकरिता ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर येथील शाळेत स्व. चंद्रकांतदादा माने देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत स्कूलबॅग वाटप
Next articleसदाशिवनगर साखर कारखान्याच्या थकीत बिलाचे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here