सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देण्याची भाजपची मागणी

कार्यवाही न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा भारतीय जनता युवा मोर्चाचा इशारा

फलटण (बारामती झटका)

फलटण येथे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, यासाठी फलटण भाजपा यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुशांत निंबाळकर भाजपा युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र, बजरंग (नाना) गावडे भाजपा फलटण तालुका अध्यक्ष, नानासो ईवरे अध्यक्ष युवामोर्चा फलटण ता., दिपक निंबाळकर तंटामुक्ती अध्यक्ष विंचुर्णी, राहुल पिसाळ संघटक युवा मोर्चा व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनात असे म्हटले आहे कि, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलांसाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहेत, हे योग्य नाही. सरकारी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, ही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करीत आहोत.

सदर प्रकार अतिशय गंभीर असून अशाच एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. सदर विषयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कार्यवाही संदर्भात विनंती आहे. कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article“from Place of work” hotels near raf museum london When you’re Aside Forever
Next articleयुवा कीर्तनकार गायनाचार्य ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जराट यांचे सुश्राव्य किर्तन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here