भांबुर्डी येथील गोरड कुटुंबीयांचे केले सांत्वन
भांबुर्डी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व तळागाळातील जनतेशी नाळ कायम ठेवणारे जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांनी नुकतीच भांबुर्डी येतील गोरड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
कुटुंबातील वयोवृद्ध दाजी साधू गोरड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत गोरड कुटुंबीयांची विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, सुरेश गोरड, कांतीलाल वाघमोडे, पत्रकार आनंद शेंडगे, एल. डी. वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng