सर्वोच्च न्यायालयाचे ओबीसी जागेच्या निवडणुका रद्द करण्याचे आदेश, निवडणूक आयोगाला प्रक्रियेला सुरुवात.

ओबीसी जागा रद्द झाल्याने पार्टी प्रमुखांची डोकेदुखी वाढणार, राजकारणाची समीकरणे बदलणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, महाळुंग नगरपंचायतची रणधुमाळी सुरु आहे. शक्तिप्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी जागेच्या निवडणूका रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोग प्रक्रियेला दिलेले असल्याने ओबीसी जागा रद्द झाल्याने पार्टी प्रमुखांची डोकेदुखी वाढणार आणि राजकारणाची समीकरणे बदलणार का ? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
न्यायमूर्ती ए.एन.खानविलकर आणि सि.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठानं महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आदेश दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. तसा अध्यादेश राज्य निवडणूक आयोगाकडे आलेला आहे. सध्या सुरू असलेल्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरपंचायतमधील वार्ड क्रमांक 7, वार्ड क्रमांक 8, वार्ड क्रमांक 9, वार्ड क्रमांक 10 तर माळशिरस नगरपंचायत वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 5, वार्ड क्रमांक 8, वार्ड क्रमांक 10 तसेच महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत वार्ड क्रमांक 3, वार्ड क्रमांक 7, वार्ड क्रमांक 14, वार्ड क्रमांक 15, अशा वार्डमध्ये ओबीसी महिला व पुरुष आरक्षण होते. अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्जसुद्धा भरलेले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने नगरपंचायत निवडणुकीतील ओबीसी उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. अनेकजण संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द झाली, असे बोलले जात होते. मात्र, उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख व माळशिरसचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश निंबाळकर यांचेकडून ओबीसी आरक्षण असलेल्या जागा वगळून इतर जागेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या 13 जागी नगरपंचायतीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. ओबीसी जागा रद्द झालेल्या असल्याने निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल होऊन उद्या छाननी होणार आहे, त्यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आय, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांच्या व अपक्ष यांच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रा.डॉ. शिवाजीराव पाटील व लेफ्टनंट प्रा. केशव पवार यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Next articleमाझी वसुंधरा अभियान पुणे विभागाची दमदार कामगिरी, विशेष लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here