सहकर महर्षी साखर कारखान्यावर संस्था प्रतिनिधी संचालक विजयदादा ? का रणजीतदादा ?, निर्णय मात्र घेणार बाळदादा.

अकलूज (बारामती झटका )

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर, अकलूज, ता. माळशिरस, या साखर कारखान्याची निवडणूक सन २०२३ जाहीर झालेली आहे. मतदारांच्या याद्या प्रारूप प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये संस्था प्रतिनिधी सहा मतदार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील संचालक असतात. मात्र, या पंचवार्षिक निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील का ? विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी, संस्था प्रतिनिधी संचालक विजयदादा का ? रणजीतदादा ?, हे ठरविणे सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निर्णय असल्याचे समर्थकांमधून बोलले जात आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदार संघात सहा संस्था आहेत व सदस्य संस्थेच्या प्रतिनिधीचे नाव त्यामध्ये अकलूज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित अकलूज, श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड अकलूज, श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, यशवंतनगर अकलूज, श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, शंकरनगर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित यशवंतनगर, श्री. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील, सुमित्रा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूज, श्री. महादेवराव गोविंदराव अंधारे, स्वरूपाराणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूज, श्रीमती वसुंधरा नंदकुमार देवडीकर अशा सह संस्था व सहा संस्थांचे प्रतिनिधी सदस्य आहेत. यामध्ये संस्था प्रतिनिधी संचालक यांची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील संस्था प्रतिनिधी म्हणून संचालक असतात. या वेळेला विजयदादा यांच्याऐवजी रणजीतदादा संस्था प्रतिनिधी संचालक म्हणून साखर कारखान्यात जाण्याची प्रबळ इच्छा समर्थकांची आहे. मात्र, सर्व निर्णय बाळदादा यांच्याकडे असल्याने रणजीतसिंह मोहिते पाटील यांना सहकार महर्षी साखर कारखान्यात संचालक पदावर कार्यरत होता येईल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ व सहकार महर्षी साखर कारखाना या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पश्चात जयसिंह मोहिते पाटील यांनी दोन्ही संस्थावर स्वतःचे कमांड ठेवलेले आहे. परिवारातील इतर सदस्यांचा दोन्ही संस्थेमध्ये हस्तक्षेप नसतो. मात्र, दोन्ही संस्थेवर विजयदादांचे मार्गदर्शन असते. विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचीही अनेक दिवसापासून सहकार महर्षी साखर कारखान्यावर चेअरमन, व्हाईस चेअरमन संचालक होण्याची मनोमन इच्छा आहे. सध्या तरी प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली आहे. निवडणूक प्रोग्रॅम पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, संस्था प्रतिनिधी मतदार संघात विजयदादा ? का रणजीतदादा ?, या चर्चेने जोर धरलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभ समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
Next articleपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते महिला बचत गट मेळावा व कर्ज वाटपाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here