सहकाराच्या तंबुत घुसले खाजगिकरणाचे उंट सहकाराला लागले ग्रहण

माळशिरस ( बारामती झटका )

सहाकाराच्या माध्यमातून परीसराचा विकास व्हावा, त्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून जनतेच्या सर्वांगीण विकास व्हावा व सहकाराच्या माध्यमातून प्रगती साधावी याकरिता अनेक जानकार नेते सक्रिय झाले होते , गावोगावी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांची स्थापना करून ग्रामीण भागातील लोकांना कर्जउपलब्ध करुन त्यांना रोजगाराचे साधंन उपलब्ध दिली जात होती , पुढे याच सोसायटींच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांचा विस्वासात घेत , तालुका व जिल्हास्तरावर सहकारी तत्त्वावर आधारित साखर कारखाने , खरेदी विक्री संघ* सुरू करण्यासाठी भाग भांडवल जमा करण्यात आले, त्यासाठी सहकार महर्षी विठ्ठल राव विखे-पाटील , धनंजयराव गाडगीळ ,व्यंकुटभाइ मेहता , यशवंतराव चव्हाण , वसंत दादा पाटील , आदींनी उपाशी पोटी पोटाला चिमटा काढत रानोमाळ फिरुन भागभांडवल जमा करून सहकार तत्वावर आधारित कारखाने सुरू केले ,त्या आधी काही ठिकाणी खाजगी उद्योग पतिंनी शेतकऱ्यांच्या जमिनी खंडाने घेऊन त्या जागेवर कारखाने उभे केले होते,त्यासाठी लागणारा कच्चा माल (उस) उपलब्ध व्हावा म्हणून अतिशय अल्प दराने हजारों एकर जमिनी महसूल विभागाच्या मदतीने अल्पशा दरात खंडाने घेऊन तेथे उस लागवड केली जात होती , पुढे काही काळ गेल्यानंतर खाजगी कारखानदारांच्या ताब्यात असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न करत त्यांच्याकडे असलेल्या कारखाण्यांचे सहकारी साखर कारखान्यात रूपांतर केले व सभासदांच्या नावावर कारखाने सुरू झाले .साधारन पणे तिन-चार दशके , सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामिन भागाची प्रगती आणि विकास होऊन कायापालट झाला, हे जरी खरे असले तरी सन,२००० साला नंतर मात्र सहकाराला घरघर लागली , पुढील पाच,दहा वर्षांत अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने,सुतगिररण्या बंद पडल्या कर्जाच्या ओझ्याने बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य शिखरं बॅंक ने दहा वर्षापूर्वी च ५० कारखाने विकुन खाजगी उद्योग पतीच्या घशात घातले आहेत , त्यामुळे त्यावर अवलंबुन असलेले सर्वच घटक विस्थापित झाले व विकासा पासुन वंचीत राहीले , निम्म्याहून अधिक कामगार देशोधडीला लागले ,कर्ज बाजारी झालेले किमान १०० कारखान्याची वसुली पोटी विक्री करण्याचे राज्य शिखर बँक ने फर्मान जारी करून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असताना, कर्ज वसुली पोटी विक्री न करता ते काही काळासाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात यावेत, जनेकरून कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांची रोजी रोटी चालू राहील ,व सभासदांचे हक्कही अबाधित राहतील म्हणू ,जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे ,मेघा पाटकर ,मा.खा ,राजु शेट्टी ,मा आमदार माणिकराव जाधव यांनी संयुक्तपणे या कारखान्याच्या विक्रिला न्यायालयात आव्हाहन याचीका दाखल केली ,त्या अनुषंगाने ग्रामीण भागात चळवळ उभी करत ८आक्टोबर २०१३ साली मुंबई येथे आझाद मैदानावर मोठ्या संख्येने साखर कामगार व सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता , त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पुर्तिराज चव्हान यांची भेट घेऊन विक्री झालेल्या कारखान्यां बाबतीत पुनर्रविचार करण्यात यावा अशी विनंती केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते , परंतु ते आस्वासन हवेतच विरुन गेले.त्याही गोष्टी ला ७/८ वर्ष उलटले , तद्नंतर ही अनेक आजारी व आपल्या राजकीय सोयीसाठी शिखर बँक च्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली , त्यामध्ये प्रंचड प्रमाणात अनागोंदी व गैरकारभार झाल्याचे अनेक चौकशी अहवालातून बाहेर आले मात्र *साखर सम्राटांना वचक बसेल अशि काही ही कारवाई झाली नाही याउलट ज्यांनि हा काळा कारभार उघड कीस आणला त्यांना मात्र प्रंचड वेदना सहन कराव्या लागल्या , या साठी, समाजसेवक अण्णा अण्णा हजारे ,का, माणिक जाधव , मेघा पाटकर ,माखा ,राजु शेट्टी , यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव* अभियान राबविण्यात आले ,त्या अनुषंगाने या पुर्वि विक्री करण्यात आलेल्या कारखाण्यांची सि.बी.आय. (इ,डी) मार्फत चौकशी करावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रखर जनऔदौलन उभे करण्यात येईल असा इशारा समाज सेवकआणा् हजारे यांनी का माणिक जाधव यांना लिहिलेल्या पत्रा तुन नुकताच दीला आहे , का , माणिक जाधव यांनी न्यायालयिन लढाई बरोबर जन आंदौलनही उंभ करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की मी अनेक वर्षांपासून सहकार चळवळ वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असुन सहकाराचे रूपांतर स्वा:वाकारात होत असल्याने सहकार क्षेत्राला हळूहळू वाळवी लागुन ते मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.सहकाराच्या माध्यमातून उभे राहीलेल्या साखर कारखान दारीला लागलेली खाजगीकरनाची किड पच्छिम.महाराष्टाबरोबर उत्तर महाराष्ट् ,विदर्भ , मराठवाड्यातील सर्वच ठिकाणी पोहोचली आहे , ज्यांनी कारखाने उभे केले,त्यांच्याच बगलबच्यांनी गैरकारभार करून डबघाईस आणुन बंद पाडले , कालांतराने डबघाईस आलेले कारखाने त्यांनिच कवडीमोल किंमतीत विकत घेऊन आपल्या सात पिढ्यांची सोय करून ठेवलीआहे , असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, सहकार चळवळीची वाटचाल खाजगी करणाकडे सुरू असुन , खाजगी करणाचा उंट सहाकाराच्या तंबुत घुसला आहे, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा उद्योग सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गंटानी केलेला आहे ,येत्या काही काळात, सहकाराला लागलेले ग्रहण थांबने गरजेचे आहे ,अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.कळावे आपला विस्वासु , कुबेर जाधव ,अभ्यासक,सहकार आणि शेती मो.नंबर : ९४२३०७२१०२.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी मायाक्का देवी मंदिर व होलार समाजाचा प्रश्न मिटवला – नारायण मारुती फारसे.
Next articleविरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा संक्रांतीनिमित्त श्रीकांत देशमुख यांचेकडून तिळगूळ देऊन सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here