सहकार महर्षीं शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकार समृद्ध केला – चंद्रकांत जाधव

मळोली ( बारामती झटका )

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकाराच्या भिंती मजबूत करून सहकार समृद्ध केला, असे प्रतिपादन मळोलीचे माजी उपसरपंच तथा भाजपा उपाध्यक्ष माळशिरस तालुका चंद्रकांत जाधव यांनी केले. मळोली येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त मळोली येथे माळशिरस तालुका भाजपाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशंकर सोसायटीचे चेअरमन महादेव जाधव उपस्थित होते. याप्रसंगी प्रगतशील बागायतदार विठ्ठल घोरपडे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जगन्नाथ जाधव, धर्मराज जाधव, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब घाडगे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव मोरे, शिवाजी वाघमारे, तुकाराम वाघमारे, शशिकांत जाधव, बंडू जाधव, अशोक जाधव, योगेश जाधव, संदीप जाधव, बाळासाहेब जाधव, राजेंद्र शिंदे, राजरत्न मोरे, बाळासाहेब गायकवाड, वसंत जाधव, उद्धव जाधव, विकास सरगर, अतुल जाधव, संजय शिंदे, रामभाऊ जाधव, विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य भीमराव मोरे यांनी केले. तर शशिकांत जाधव यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाघोली येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Next articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या भावनेचा आदर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here