सहकार महर्षी चारिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या जागेचा ताबा घेण्याच्या हालचाली वाढल्या.

माळशिरसचे तहसीलदार यांचे मंडलाधिकारी अकलूज यांना ताबा देण्याची कार्यवाही करून कब्जे पावती सह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.


अकलूज ( बारामती झटका )

माळशिरसचे तहसीलदार यांनी अकलूज मंडलाधिकारी यांना वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी कायदा 2002 अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चारीटेबल ट्रस्ट यशवंनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचा ताबा घेण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत त्यामुळे माळशिरस तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे.
हकिगत अशी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चारिटेबल यशवंनगर तालुका माळशिरस या ट्रस्टने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव बँक यांचेकडून 32 कोटी रुपये कर्ज रूपाने घेतलेले होते सदर कर्जापैकी दोन कोटी रुपये कर्जत व व्याजाच्या रकम भरलेली होती. गेल्या दहा वर्षापासून बँकेचे ट्रस्टकडे पैसे असल्याने जवळजवळ 65 ते 70 कोटीच्या आसपास रक्कम झालेले आहे थकित रकमेसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव बँकेने वेळोवेळी थकीत कर्जासाठी पाठपुरावा केलेला होता मात्र सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चारीटेबल ट्रस्ट यशवंनगरच्या ट्रस्टींनी पैसे भरलेले नसल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्राधिकृत अधिकारी किसन मोटे यांनी जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे तक्रार केली आणि अप्पर जिल्हाधिकारी यांनी माळशिरस तहसीलदार यांना ताबा घेण्याचे पत्र दिनांक 7/ 4/ 20 21 रोजी दिलेले होते त्या अनुषंगाने तहसीलदार माळशिरस यांनी 25/ 10 /20 21 रोजी मंडळाधिकारी अकलूज यांना तहसीलदार यांनी पत्र दिलेले आहे.
सदर पत्रामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चारिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट यशवंनगर तालुका माळशिरस यांनी दिनांक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव बँक लिमिटेड शाखा सोलापूर यांचेकडून कर्ज घेतले आहे त्या अनुषंगाने संदर्भीय आदेशान्वये नमूद केले प्रमाणे बँकेकडे गहाण असलेली मिळकतीचा ताबा देणे कामे आदेशित केले आहे.


वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी कायदा 2002 मधील कलम 14( 1 ) (अ)( बा) मधील तरतुदीनुसार कर्जदार जामीनदार यांची मिळकतीचा ताबा देणे घेणे बाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी संदर्भीय आदेशान्वये प्राधिकृत अधिकारी किसन मोटे दि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव बँक लिमिटेड शाखा सोलापूर यांना ताबा देऊन अहवाल सादर करणेबाबत कळवले आहे.
या सोबत संदर्भीय आदेशाची छायांकित प्रत जोडली असून त्यामध्ये नमूद केले नुसार ताबा देण्याची कार्यवाही करून कब्जे पावती सह तात्काळ अहवाल इकडील कार्यालयास सादर करावा असे पत्र तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी अकलूज यांना देऊन सदर पत्राची प्रत प्राधिकृत अधिकारी किसन मोटे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चारीटेबल ट्रस्ट यशवंनगर ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अकलूज, उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांना माहितीसाठी पाठवलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचा जनहितार्थ दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला.
Next articleस्मृती क्रिकेट क्लबच्या वतीने शिवपुरी येथे भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here