संग्रामनगर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमीत्त नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे युवानेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बारामतीचे डाॅ. अभिजीत बर्गे, डाॅ. भिमराव मोरे आदी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील नागरिक व वयोवृद्धांसाठी हे शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात एकूण १०१ नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यात २२ लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे तर ३१ लोकांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विजयवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश भंडारे, उपसरपंच शंकरराव वाघमोडे, सदस्य सौ. सरस्वतीताई बंडगर, सौ. सोनाबाई शिंदे, रविंद्र इंगळे, आप्पसाहेब इंगळे, अनिल लावंड (पोलीस पाटील), सुनिल लावंड, मनिषा इंगळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब इंगळे, ग्रामसेविका मनिषा साठे, अशोक शिंदे, रामा शिंदे, शिवाजी बंडगर, दत्तात्रय इंगळे, संजय इंगळे, सुनिल शिंदे, उमेश इंगळे, शंकर लावंड, चौंडेश्वरवाडीचे सरपंच सतिश शिंदे, शंकर शिंदे, तात्या शिंदे, अमर वाघमोडे, गणपत बंडगर, अल्ताप शेख, अर्जुन पवार, दिपक इंगळे, सुशांत राजरत्न, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng