सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

अकलूज (बारामती झटका)

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्या. विजयनगर, सोलापूर कॅन्सर सेंटर व ऑप्टीमस ऑन्कोलाजी व उपजिल्हा रुग्णालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वा. मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे करण्यात आले आहे. या शिबिराच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे असणार आहेत.

त्याचबरोबर विधानपरिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन सावता ढोपे, कॅन्सर सर्जन डॉ. फहीम गोलीवाले, किमोथेरपी तज्ञ डॉ. विपुल दोशी, रेडिएशन थेरपी तज्ञ डॉ. धिरज सिन्हा, रेडिएशन थेरपी तज्ञ डॉ. करण चंचलानी, हिमॅटो ऑन्कोलॉजीस्ट डॉ. सुनील हिलालपुरे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

सदर शिबिरासाठी सोलापूर कॅन्सर सेंटर ऑप्टिमस ऑन्कोलॉजी येथील कॅन्सर विशेषज्ञ कॅन्सरग्रस्त रुग्णांची तपासणी करणार आहे. शिबिरातील रुग्णांना कॅन्सर संबंधित सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा (उदा. ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन उपचार) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना/आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे कर्करोगतज्ज्ञ सकाळी ९ ते १२ या वेळेत मोफत तपासणी करतील. सदर शिबिर हे शासनाच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करून करण्यात येईल. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त कॅन्सरग्रस्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर.
Next articleगुरसाळे गावातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय पाणी वापर संस्था व पाटबंधारे विभाग नरमला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here