सहकार महर्षी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार… #सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना #कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज

मान हलायला लागली, अजून किती दिवस सतरंज्या उचलायच्या, असा सवाल वंचित घटकांकडून उपस्थित केला जात आहे..

माळशिरस ( बारामती झटका )

मोहिते पाटील परिवारांचे प्राबल्य असणाऱ्या #सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना व #अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन सहकारी संस्थांच्या निवडणूकीचे पडघम वाजलेले आहेत. सहकार महर्षी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन्ही संस्थेवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे निकटवर्तीय यांच्याकडून बोलले जात आहे. तर आमच्या माना हलायला लागल्या, वय निघून चालली, तरीसुद्धा आम्हाला कोणत्याच संस्थेवर सन्मानाने पद मिळालेले नाही, अजून किती दिवस सतरांच्या उचलायच्या ?, असा संतप्त सवाल मोहिते पाटील समर्थक वंचित घटकांकडून उपस्थित केला जात आहे.

माळशिरस तालुक्यात प्रस्थापित म्हणून #मोहिते पाटील परिवार यांच्याकडे पाहिले जाते. तालुक्यात अनेक सहकारी संस्था आहेत. त्या संस्थेवर मोहिते पाटील गटाचे वर्चस्व आहे. अनेक पंचवार्षिक निवडणुकीत त्याच सदस्यांना किंवा परिवारातील नातेवाईकांना संधी दिली जात आहे. अनेक निष्ठावान कार्यकर्ते पदापासून वंचित आहेत. वंचित घटकांना कधी न्याय मिळणार ?, का आमचा फक्त वापरच करून घेतला जाणार ?, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत चाललेली असल्याने सहकार महर्षी साखर कारखाना व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. राजकीय समतोल राखण्याकरता नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे मोहिते पाटील यांच्या गोटातील समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यामध्ये कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. तर दुसरीकडे मोहिते पाटलांवर निष्ठा ठेवून आमच्या दोन पिढ्या गेल्या. आमची सुद्धा मान हलायला लागली, अजून किती दिवस सतरंज्या उचलायच्या ?, असा वंचित घटकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मोहिते पाटील परिवार काय भूमिका घेतात यावर सहकार महर्षी साखर कारखाना व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. निश्चितपणे दोन्हीही सहकारी संस्थेवर विरोधी गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाला उमेदवारी ठरवीत असताना डोकेदुखी ठरणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleयेळीव गावच्या शिरपेचामध्ये कु. राजश्री रामचंद्र निंबाळकर हिने मानाचा तुरा रोवला… #राजश्री रामचंद्र निंबाळकर #कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट
Next articleएक लाखाची लाच घेताना सरपंचपती जाळ्यात #सरपंचपती #लाचलुचपत विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here