सहकार महर्षी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी विजय मंडलिक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न…

अकलूज ( बारामती झटका )

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्वस्त धान्य दुकानदार संघटना माळशिरस यांच्या कार्यकारणीची बैठक अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, पंचायत समिती माळशिरसचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून श्री. विजय मंडलिक वेळापुर, व उपअध्यक्ष श्री. जगन्नाथ शेळके, श्री. सुभाष शिकारे, श्री. विठ्ठल अर्जुन यांची तर खजिनदार पदी श्री. प्रकाश पवार, सचिव श्री. वसंत जाधव यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून श्री. महादेव तरंगे, श्री. विश्वास सिद, श्री. मिलिंद रेडेकर, श्री. किरण टकले, श्री. शंकर भिताडे, सौ. पुष्पलता कर्चे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर बैठकीसाठी तालुक्यातील सर्व भागातील स्वस्त धान्य दुकानदार मोठया प्रमाणात उपस्थित होते. नूतन कार्यकारणीचा सत्कार मदनसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आला. व पुढील कार्यासाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाफेगाव सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी हनुमंत चव्हाण तर, व्हाईस चेअरमनपदी संभाजी सरवदे यांची निवड.
Next articleचि. डॉ. आशिष मोटे पाटील फोंडशिरस आणि चि.सौ.कां. डॉ. सुवर्णा वाघमोडे पाटील उंबरे दहिगाव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here