राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते पदक देऊन केले सन्मानित
खडकी (बारामती झटका)
दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप ऊर्फ बापू जांभळे यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक २०२२ पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक देऊन जांभळे यांना सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे राष्ट्रपती पदक प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या समारंभात जांभळे यांना मेडल, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
बापू जांभळे यांना २००९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महासंचालकपद मिळाले आहे. जांभळे यांना आतापर्यंत ३२८ पदके मिळाले असून तसेच पारितोषिक मिळवुन समाजामध्ये आपली एक वेगळी छाप उमटवली आहे.
बापु जांभळे यांनी आतापर्यंत आपल्या सेवा कालावधीमध्ये २१ लाख रुपये किमतीची १०१ पिस्तूलसह १३८ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत, तसेच भारतात बेकायदा वास्तव्य करुन पाकिस्तानातील गुप्तहेर संस्थेसाठी काम करणाऱ्या पाच बांग्लादेशी यांना जेरबंद करण्यात मुख्य सहभाग होता.
प्रदीप जांभळे यांचे शिक्षण खडकी येथील ऑल सेंट शाळेमध्ये झाले, शाळेमध्ये असताना त्यांना बॉक्सिंगची आवड निर्माण झाली होती. त्यांचे वडील हरिश्चंद्र कोंडिबा जांभळे हे देखील पोलीस निरीक्षक होते. पोलिस दलात काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच प्रेरणेतून त्यांनी १९८७ मध्ये पोलिस दलात प्रवेश केला.
बापू जांभळे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये खडकी, सहकारनगर, चंदननगर आदी परिसरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक, विशेष तपास पथक, सामाजिक सुरक्षा विभाग, दरोडा पथक आदी विभागामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. बापू जांभळे सध्या एटीएसमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत. राष्ट्रपती पदक २०२२ मधील पुणे शहरातून पदक मिळविणारे एकमेव ठरले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng