श्रीपूर (बारामती झटका)
गेली दोन वर्षे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन कोरोना पार्श्वभूमीवर बंद आहे. या वर्षी भारतातील कोट्यवधी आंबेडकरी जनता मुंबईला दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव प्रज्ञावंत युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आतुर झाली होती. मात्र, पुन्हा महाराष्ट्र शासनाने कोरोनाची भीती दाखवून महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत. केवळ पंचवीस टक्के उपस्थिती राहिल, तसेच सार्वजनिक कार्यक्रम सभा, वैचारिक मंथन, गायन पार्टी यांवर निर्बंध घालून तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना, श्रध्दा यांना धक्का देण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजकीय नेते मंत्री यांच्या मुलांच्या लग्नसमारंभात झालेली गर्दी चालते, राजकीय पक्षांच्या सभा मेळावा यांची गर्दी चालते, तसेच गेल्या महिन्यात पंढरपुरात कार्तिकी वारीला तीन ते चार लाख भाविकांची गर्दी चालते, मात्र कोट्यावधी दलितांचे श्रध्दास्थान असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर आंबेडकरी जनता एकत्रीत आलेली चालत नाही, हे दुर्दैव आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng