….अन्यथा पुणे येथील मुद्रांक निरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे हर्षदभाऊ भोसले यांनी दिला.
पुणे ( बारामती झटका )
सह. दुय्यम निबंधक इंदापूर, दौंड, बारामती, तळेगाव, ढमढेरे, बारामती, वडगाव, मावळ, लोणावळा या ठिकाणी केलेल्या बोगस दस्तांची चौकशी करा. अन्यथा पुणे येथील मुद्रांक निरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे हर्षदभाऊ भोसले यांनी दिला.
संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे हर्षदभाऊ भोसले यांनी पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेले आहे. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, सहाय्यक दुय्यम निबंधक इंदापूर या ठिकाणी प्रभारी म्हणून कार्यरत असलेले अरुण आव्हाड व देवशाली हिंगमिरे मॅडम यांनी केलेल्या बोगस दस्त तसेच त्यांच्या कार्यकालामध्ये केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी आम्ही अर्ज करत आहोत. रेरा, तुकडाबंदी असताना देखील हे अधिकारी कायद्याचे उल्लंघन करून आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाचा महसूल बुडवून स्वतःच्या तिजोऱ्या भरत आहेत व बेहिशोबी मालमत्ता गोळा करत आहेत. यांना संबंधित वरिष्ठ अधिकारी सहकार्य करत आहेत. त्यांना विचारपूस केली असता ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगत आहेत. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने पुणे शहरात कारवाईचे सत्र ठेवले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पोलखोल केला. निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे जनसामान्य माणसांमध्ये आपल्याबद्दल जो अभिमान वाटू लागला. यांच्यावरती कारवाई करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत. परंतु, एक गोष्ट आम्हाला समजत नाही, कित्येक वर्ष पुणे ग्रामीणला एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस दस्ताचे काम चालू आहे. इंदापूर, दौंड, तळेगाव, ढमढेरे, बारामती, वडगाव, मावळ, लोणावळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना देखील कारवाई होत नाही. जशी पुणे शहरामध्ये कारवाई होते, तशी पुणे ग्रामीणला कारवाई होताना दिसत नाही. या मागणीसाठी दि. 10/05/2022 रोजी मुद्रांक निरीक्षक पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

तरी आपणास विनंती आहे की, आपण कागदपत्राची योग्य ती शहानिशा करून निलंबनाची कारवाई करावी. सोबत पुरावे कागदपत्रे जोडत आहोत. अशा आशयाचे निवेदन महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्षनेते विधानसभा विधान परिषद, नोंदणी महानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंद गार्डन पोलीस स्टेशन पुणे यांना देण्यात आलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng