सांगोला (बारामती झटका)
सांगोला तालुक्यातील कटफळ हद्दीतील गट नंबर 371 या शेत जमिनी मध्ये ड्रॅगन फ्रुट आंब्याच्या झाडाचे पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकरी तक्रारदार कविता नवनाथ कुटे यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे
मौजे कटफळ हद्दीतील गट नंबर 371मध्ये 7/12 वरती पार्वती पाटोळे हिचे नाव असून कल्लापा कुटे, भगवान कुटे व इतर जणांची नावे 7/12 सदरी आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रंजना शिवाजी काळे,कल्पना कुटे , संगीता कुटे सर्वजण गवत काढत होते आणि या दरम्यान त्यांच्या भावाचा मुलगा राहुल भानुदास काळे शेळ्या राखत असताना अंदाजे 25 ते 30 लोक येऊन राहूल काळे यास दमदाटी करू लागले तुझे शेतामध्ये काय काम असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करू लागले त्यावेळी मी व माझ्या सोबत असणाऱ्या बायका असे सर्वजण त्या ठिकाणी गेलो त्यातील प्रशांत राक्षे राहणार पंढरपूर नागेश शिवाजी घोडके राहणार बोहोळी विजय राक्षे राहणार दिघंची नितीन कुरुळे रा.उघडेवाडी तालुका माळशिरस इ सह त्यांच्यासोबत 25 ते 30 लोक गवत काढू नका असे म्हणून अडवणूक करू लागले त्यातील नागेश घोडके याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने राहुल काळे याच्या डाव्या गुडघ्यावर मारहाण केली तसेच त्यातील प्रशांत राक्षे याचे हातात तलवार व इतर लोकांच्या हातामध्ये काठ्या दगड बंदुका घेऊन मला व माझ्या सोबतच या बायकांना तुम्ही शेतात आला तर तुम्हाला ठेवत नाही खलास करतो असे म्हणून त्यातील नागेश शिवाजी घोडके याने माझा हात धरून माझ्या मनास लाज वाटेल अशी कृत्य केले.

त्यातील सर्व लोकांनी मिळून ड्रॅगन फ्रुट साठी केलेले सिमेंट पोल तोडून एकूण अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान केले राहुल काळे यास मारहाण करीत असताना मी त्याला सोडवते वेळी माझ्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र प्रशांत राक्षे याने काढून घेतले आहे मला व माझ्या सोबत असलेल्या रंजना शिवाजी काळे ,कल्पना आजिनाथ कुटे, संगीता गणेश कुटे, उषा कलाप्पा कुटे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली वरील सर्व आरोपी यांचे पासून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे म्हणून माझे सर्व वरील आरोपींविरोधात माझी तक्रार आहे अशा आशयाचा जबाब कविता नवनाथ कुटे यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे. आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 नुसार 354 ,327, 324 ,341, 427 ,323, 504 ,506, 143 ,147 ,148, 149 या कलमनुसार गुन्हा नोंद असून पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी व ठाणे अंमलदार सुहास जगताप हे करत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng