सांगोला येथे विज्ञान महाविद्यालय येथे मानवी हक्क या विषयावर अ‍ॅड. समाधान खांडेकर यांचे व्याख्यान संपन्न

सांगोला (बारामती झटका)

मंगळवार दि. १३ डिसेंबर रोजी विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे मानवी हक्क या विषयावर अ‍ॅड. समाधान खांडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. समाधान खांडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे  प्र. प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेख एन. एस. यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ‍ॅड. समाधान खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी सांगितले कि, मानवाला संपत्तीचे हक्क, भाषण स्वातंत्र्याचे हक्क, नागरिकत्वाचे हक्क आणि विविध मानवी हक्कांवर त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि, मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पांडुरंग लवटे यांनी केले.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. बाळासाहेब सरगर, प्रा. धर्मराज कोळवले हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुण्यात नोटा तयार करून माढा, करमाळ्याच्या बाजारात विक्री करणाऱ्या चौघांना केले जेरबंद
Next articleHow to pick the Top Data Room Suppliers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here