तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ येथे आज कांबळे परिवाराने साखरपुडा आयोजित केलेला होता. या साखरपुड्यासाठी शिंदेवाडी येथील रणदिवे परिवार उपस्थित झाला होता. साखरपुडा चालू असतानाच तरंगफळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या व समाजसेविका श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांनी त्याच कार्यक्रमात लग्न सोहळा उरकून घेण्याची दोन्ही परिवारांना विनंती केली. लगोलग दोन्हीही परिवारांनी होकार देऊन मोठ्या थाटामाटात ग्रामस्थ, पाहुणे व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत श्रीमती जगुबाई मारुती जानकर यांच्याच निवासस्थानी विवाह सोहळ्याचा कार्यक्रम थाटात पार पडला.
श्री. तात्यासाहेब जगन्नाथ कांबळे यांची ज्येष्ठ कन्या चंद्रभागा व अंकुश शंकर रणदिवे रा. शिंदेवाडी यांचे ज्येष्ठ चिरंजीव सतीश यांचे लग्न काही दिवसापूर्वी जमले होते. त्यानंतर आज साखरपुडा आयोजित केला होता. या लग्न समारंभासाठी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी सरपंच सुजित तरंगे, युवा नेते अभिजीत तरंगे, शिक्षण समितीचे अध्यक्ष गोविंद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुका सरचिटणीस महावीर कांबळे, युवा नेते दादासो तरंगे, माजी सरपंच नानासो पाटील सर, बापू गोरड, माजी सदस्य गोरख मोहिते यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng