साखर कारखाना सुरू व्हावा शेतकऱ्यांची इच्छा, त्याहीपेक्षा ज्यादा इच्छा शेतकऱ्यांचे पैसे मिळावे – प्रकाशबापू पाटील.

सदाशिवनगर साखर कारखान्यावर मोहिते पाटील गटाचे पंचायत समिती सदस्य किशोर सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राजकीय पक्ष व शेतकरी संघटना यांचे थकीत ऊस बिलासाठी आंदोलन सुरू

प्रकाशबापू पाटील, शंकरनाना देशमुख, माणिकबापू वाघमोडे, गजानन पाटील, गौतमआबा माने, बाजीराव माने, रमेश पाटील, धैर्यशील पाटील, मधुकर पाटील, जयवंत पालवे, बाबासाहेब माने, अजित बोरकर, अप्पासाहेब कर्चे, विष्णुपंत नारनवर, युवराज झंजे, सोमनाथ पिसे, दगडू मारकड आदींची उपस्थिती

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखाना बंद होता तो सुरू व्हावा शेतकऱ्यांची इच्छा आहे त्याहीपेक्षा शेतकऱ्याने या कारखान्याला गाळपासाठी घातलेल्या उसाचे पैसे मिळावेत हीच शेतकऱ्यांची ज्यादा इच्छा आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशासाठी रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ कारखाना प्रशासनाने आणलेली आहे, असे मत श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी कारखाना स्थळावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आंदोलनास पाठिंबा देऊन समर्थन देण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, माळशिरसचे ज्येष्ठ नेते गजानन पाटील, विधी तज्ञ धैर्यशील पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत पालवे, मधुकर पाटील, बाळासाहेब लवटे पाटील, नातेपुते नगरीचे युवा उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, ज्येष्ठ नेते बाजीनाना माने, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, पंचायत समिती सदस्य अजय सकट, शिवराज पुकळे, आबासाहेब माने, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, मेडदचे सरपंच युवराज झंजे, उंबरे दहिगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर, किसान सभा अध्यक्ष मच्छिंद्र गोरड सर, काँग्रेसचे सरचिटणीस शामराव बंडगर, वस्ताद सर्जेराव घोडके, पोपटराव लवटे, तात्यासाहेब वाघमोडे, गोरडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य पांडुरंग पिसे, सोसायटीचे माजी चेअरमन खंडूतात्या कळसुले, विशाल पाटील, समाधान काळे, गुरसाळे ग्रामपंचायतचे सदस्य गणेश काटे, तुषार पाटील, वैभव दडस, राजेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भांगे, रामभाऊ वाघमोडे, सुनील गोरे, ज्ञानेश्वर काटे, सदाशिव माने, स्वाभिमानीचे युवक अध्यक्ष अजित कोडग, विधानसभा अध्यक्ष साहिल आतार, समाधान काळे, दादा वाघंबरे, दहिगाव गावचे युवा नेते राहुल सावंत, ओबीसी सरचिटणीस नवनाथ काळे, कोषाध्यक्ष सचिन ढगे, आबा माने, दत्तू ठोंबरे, सचिन गोरे, सचिन रुपनवर, राहुल सुळ, सहकार महर्षी व विजय दादांचे विश्वासू सहकारी मारकड वाडीचे प्रगतशील बागायतदार दगडू मारकड आदी मान्यवरांसह विविध गावातील शेतकरीबांधव कामगार उपस्थित होते.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी मोहिते पाटील गटाचे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राजकीय पक्ष व शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांसमवेत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा पाचवा दिवस सुरू आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना पाठबळ देण्याकरता मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाशबापू पाटील बोलताना पुढे म्हणाले की, कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत बिले देऊन कारखान्याला रीतसर परवाना घेऊन कारखाना सुरू करणे गरजेचे आहे. कारखाना सुरू झाला पाहिजे, आमच्या सर्वांसह शेतकऱ्यांची इच्छा आहे मात्र, ऊस बिलाचे पैसे मिळावे हीपण ज्यादा इच्छा आहे. कारखान्याने शासनाच्या नियमाने कारखाना सुरु करावा, शेतकऱ्यांना पैशासाठी आंदोलन करण्याची दुर्देवी वेळ आलेली आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. सोमवारी सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. निश्चित आंदोलनाला यश येणार असल्याचे उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश पाटील यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या थकित बिलाच्या आंदोलनाची सरकार व साखर आयुक्त यांनी घेतली दखल.
Next articleशिवपुरी येथे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here