सातारा जिल्ह्यातील औंध गावची कन्या नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध विराजमान.

सौ. उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांच्या रुपाने खाटीक समाजास नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा प्रथम बहुमान मिळाला.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत जनशक्ती विकास पॅनलने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठनेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली 11 नगरसेवक निवडून आलेले होते. नगराध्यक्ष निवडीच्या दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी नगराध्यक्षपदासाठी सौ. उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याने दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी नगराध्यक्षपदाची औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे सौ. उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांच्या रूपाने खाटीक समाजास नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे.

सौ. उत्कर्षाराणी यांचे माहेर सातारा जिल्ह्यातील औंध येथील आहे. औंध गावची कन्या नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी बिनविरोध विराजमान होणार आहेत. औंध गावाची ओळख यमाईदेवीचे जागृत पुरातन मंदिर आहे. अशा गावामध्ये सौ. कमल व श्री. प्रभाकर मारुती कांबळे सर्वसामान्य कुटुंबातील दांपत्य आहे. त्यांना अमर, सत्वशीला, सागर, वैशाली, उत्कर्षा व दत्तात्रय अशी सहा अपत्य आहेत. उत्कर्षाराणी यांचा जन्म 1981 साली झालेला आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंध येथे झाले. पाचवी ते दहावी श्री विद्यालय औंध येथे झाले आहे. अकरावी ते बारावी सातारा येथील कन्या शाळा मुलींची या ठिकाणी झालेले आहे. त्यांचा डी एम एल टी कोर्स त्याच शाळेमध्ये पूर्ण झालेला आहे. त्यावेळी त्यांचा दुसरा नंबर आलेला होता. विशेष म्हणजे सातारा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सुकटणकर यांच्या दवाखान्यांमध्ये डी एम एल टी चा कोर्स सुरू असल्यापासून त्यांनी त्या ठिकाणी पाच वर्ष काम केलेले आहे.

सन २००३ साली नातेपुते ता. माळशिरस येथील सौ. विमल व श्री. बबन दामोदर पलंगे यांचे चिरंजीव उमेश पलंगे यांच्याशी शुभविवाह झालेला आहे. उमेश पलंगे यांचे डी फार्मसी शिक्षण पूर्ण होऊन त्यांनी मेडिकल रिटेल व्यवसाय सुरु केलेला होता. त्यांना उत्कर्षाराणी यांची साथ मिळाल्यानंतर पलंगे फार्मासिटी नावाने होलसेल मेडिकलचा व्यवसाय सुरू आहे. उत्कर्षाराणी व उमेश यांना बारावीत शिकत असणारा मुलगा रेवन व नववी मध्ये शिकत असणारी रचना अशी दोन अपत्ये आहेत.
उत्कर्षराणी यांना माहेरच्या परिवारातील राजकीय वारसा नाही. त्यांच्या आई-वडीलांची दहावीमध्ये शिकत असताना देवआज्ञा झाली आहे. सासरी वच्‍छलाबाई पलंगे व वामन पलंगे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेची इमाने इतबारे सेवा केलेली आहे. थोडाफार राजकीय वारसा सासरी मिळालेला आहे.
ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक सुरू झाली. त्यावेळी उत्कर्षाराणी पलंगे यांना जनशक्ती पॅनलच्या माध्यमातून शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, राजेंद्रभाऊ पाटील, मामासाहेब पांढरे यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने नगरसेवक होण्याची संधी मिळाली. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षित असल्याने खटीक समाजास उत्कर्षाराणी पलंगे यांच्या रूपाने संधी मिळालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकण्हेर गावचे माने-पाटील आणि तिरवंडी गावचे वाघमोडे-पाटील यांचा शुभमंगल कार्य सोहळा.
Next articleवेळापूर येथील हरिभाऊ शंकरराव मुंगूसकर पाटील यांचे वार्धक्याने दुःखद निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here