सर्वसामान्यांचा पैसा अडकला, बँक, पतसंस्थेतील अपहार उघडकीस
सातारा (बारामती झटका)
राज्यात नवनवे घोटाळे उघड होत असतानाच यातून सातारा जिल्हाही सुटला नाही. गेल्या पाच वर्षात सातारा जिल्ह्यात तब्बल १८७ कोटींचे घोटाळे झाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वसामान्य लोकांनी पोटाला चिमटा देऊन साठवलेले पैसे बँका आणि पतसंस्थेत बुडाल्याने सर्वसामान्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे तरी घोटाळ्याची बातमी आपण ऐकत आणि वाचत असतो. पण आपल्या सातारा जिल्ह्यातही रोज नवनवे घोटाळे उघडकीस येत आहेत. याची मात्र फारशी वाच्यता होत नाही. एका घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच दुसरे घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घोटाळ्यांचा आकडा वाढतच चाललाय. गेल्या पाच वर्षात १८७ कोटींचे घोटाळे झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये बँका, पतसंस्था आणि सोसायटी यांचा समावेश आहे. अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची पुंजी या संस्थांमध्ये ठेव स्वरूपात ठेवली होती. काहींनी तर सेवानिवृत्तीनंतर मिळालेली एकरकमी रक्कम पतसंस्था आणि बँकांमध्ये ठेवली होती.
हे आहेत अटकेतील आरोपी
- गितेश साहेबराव गायकवाड, शिरंबे, कोरेगाव
- तन्मय प्रशांत रणसिंग, फलटण
- देवदत्त चंद्रकांत काणे, शिवाजीनगर, पुणे
- दिनेश दिलीप फलक, जळगाव
- रमेश दगडू जाधव, वाई
- ललित सूर्यकांत खामकर, वाई
- अविनाश अशोक गाडे, वाई
- तुषार सखाराम चक्के
- अमोल रावसाहेब खोतलांडे
- नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, वाई
- संतोष नंदकुमार ईनामदार सदर बझार, सातारा
- प्रसाद भानुदास निकम
- संजय दिगंबर इनामदार
- गोल्डबन मॉरीस उर्फ कादरी मोहम्मद अली
- आर्थिक गुन्हे शाखेने टाकली कात
जिल्ह्यात उघडकीस येणाऱ्या घोटाळ्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असतो. गेल्या सहा महिन्यांपासून या शाखेने कात टाकली असून घोटाळा करून फरार झालेले वर्षानुवर्षे गायब असलेल्या संचालकांसह चेअरमनांनाही या शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. एवढेच नव्हे तर तातडीने तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये कोरेगाव, लोणंद, फलटण, कराड, पाटण, खंडाळा अशा १२ संस्थांचा समावेश आहे. - शरीर त्यांना साथ देईना
एकामागून एक बँका आणि पतसंस्थांमध्ये घोटाळे झाल्याने लाखो रुपयांच्या ठेवी सर्वसामान्यांच्या बुडाल्या. पैसे परत मिळावेत म्हणून लढा उभारण्यासाठी अनेक वृद्धांना त्यांचे शरीर साथही देत नाही. पैसे परत मिळेपर्यंत आपण जगू की मरू, याची शाश्वती नाही. - काही ठळक अपहार
- पी ए सी एल इंडिया लि. कस्टमर सर्विस सेंटर, सातारा २३,८२,४७,९२७
- जिजामाता सहकारी बँक, लि., सातारा २३,८८,५४,३१५,५३
- जिजामाता महिला सहकारी बँक, लि. सातारा, शाखा कराड १३,७६,६४,३८६
- हनुमान सहकारी पाणीपुरवठा पतसंस्था, कासारशिरंबे कराड २,००,३९,२२३
- रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रा. लि. सातारा १३,५५,०००
- विविध कार्यकारी सोसायटी देऊर, ता. कोरेगाव २,१६,२५,८१७,२२
- राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्या. म्हसवड ९९,७०,०००
- चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण पतसंस्था कोळकी, फलटण २४,०१,६०,७६१
- चैतन्य ग्रामीण बिगर शेती पतसंस्था वडूज, ता. खटाव २७,४६,०२,७९७
- आदित्य सेल्स कॉर्पोरेशन व लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन म्हसवड, ता. माण १,६३,०६,२००
- कलकाम रियल इन्फ्रा. (इ.) लि. मुंबई, कराड ६६,६८,५८३
- परकीय नागरिकांकडून फसवणूक, सातारा शहर १,२७,४६,०००
- हरिहरेश्वर बँक, वाई ३७,४६,८९,३४४
- युटोपिया अप्टोव्हिजन प्रा. लि. सातारा शहर १३,६४,७१,८७६
- कालिकाई इंडस्ट्रीज वडाळा, मुंबई, पाटण शाखा ११,४१,६७,२२२
- नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng