सातारा (बारामती झटका)
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०-२१ मध्ये महाविद्यालयात विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी कॉलेजच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेली वरदा जोशी [संस्कृत], मृणाल वाघमारे [भूगोल], समीर भोईटे [इतिहास], गौरी मोरे [इंग्रजी], शरयू काळभोर [मानसशास्त्र], रुपाली काळे [हिंदी], आदिती चिवटे [मराठी], मेघ खरात [समाजशास्त्र], ऋतुजा गायकवाड [राज्यशास्त्र], किरण जगताप [बी.व्होक], रचना सावंत [अर्धमागधी], दत्ता घाडगे [अर्धमागधी], शिवाली मोहिते [अर्थशास्त्र], पूजा वाघमळे [एम.ए. अर्थशास्त्र प्रथम], वर्षा कवले [समाजशास्त्र] तसेच शिवाजी विद्यापीठ एम.ए. परीक्षेतील विविध विषयात विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी योगिता फाळके [संस्कृत -द्वितीय], जुई पतंगे [प्रथम-राज्यशास्त्र], अश्विनी आटपाडकर [सातवी-राज्यशास्त्र], प्रतीक्षा गायकवाड [दहावी – इंग्रजी], इमाम पठाण [सहावा-हिंदी], राधिका शिंदे [दहावी-हिंदी], साजन केंगार [सातवा-इतिहास], निकिता खराडे [नववी-अर्थशास्त्र], कोमल मस्के [प्रथम-मराठी], धनश्री कारळे [प्रथम-भूगोल], माहेश्वरी गोळे [प्रथम-सुवर्ण पदक-संस्कृत] यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
तसेच वैभवी काळे [प्रथम -११वी], नीलम भोसले [१२ वी प्रथम], श्वेता वाघमारे [११वी प्रथम], वैभवी काळे [१२ वी प्रथम], नेट सेट परीक्षेत पास झालेले विद्यार्थी धनश्री कारळे [भूगोल नेट-सेट], अमृता वाईकर [हिंदी], रफिक मुल्ला [इंग्रजी], अनुराधा घाडगे [मराठी-नेट], दशरथ जाधव [भूगोल-सेट], अश्विनी खवळे [इतिहास -सेट], सागर कारंडे [मानसशास्त्र-सेट] यांना सन्मानचिन्ह देऊन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव मा. संजय नागपुरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. पूजा मोरे व प्राजक्ता शिंदे यांना मलखांबमध्ये ब्रांझ पदक व शिवाजी विद्यापीठ कलर अवार्ड मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. एन.सी.सी. विभागातील आजादी का अमृत महोत्सव दौडमध्ये प्रवीण रोडे यास सुवर्ण पदक व जयश्री कदम हिला कांस्य पदक मिळाल्याबद्दल, आकाक्षा मोरे हिस बटालियन मधील बेस्ट शुटर व रोहित शिंदे, सन शेख, ख़ुशी जांगीड यांनी एक भारत श्रेष्ठ भारत हा राष्ट्रीय कॅम्प पूर्ण केल्याबद्दल व श्रीकांत शेडगे याची राष्ट्रीय स्तरावरील शिवाजी ट्रेल ट्रेक कॅम्पसाठी निवड झाली त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वक्तृत्व, वादविवाद इत्यादी स्पर्धेत विजेते ठरलेले हर्षदा हिंगणे [प्रथम -कथा लेखन], साक्षी घाडगे [वक्तृत्व – द्वितीय, कथाकथन -प्रथम], दत्तात्रय चोरमले [प्रथम-वक्तृत्व], वादविवाद व वक्तृत्व व काव्य वाचन [सुजित काळनगे], श्वेता कुंभार [प्रथम -वक्तृव], आस्था कारने [निबंध -द्वितीय] आणि झुळूक नावाची कांदबरी लिहिणारी ऋतुजा पाटील हिस सन्मानचिन्ह व मानपत्र देण्यात आले आहे. अंकुर साळुंखे [दिल्ली येथील कला स्पर्धेतील यश], आदित्य मोरे [राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम] यांच्या यशाबद्दल व कोमल घाडगे हिची सब-इन्स्पेक्टर पदी व स्नेहा यादव हिची इन्फोसिस या आय.टी. कंपनीत निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. साईराज शिंदे यास बेस्ट रीडर, आसावरी चव्हाण हिला प्राचार्य के. एस. मोहिते बेस्ट स्टुडंट, प्रियांका लोखंडे हिला प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील बेस्ट स्टुडंट अवार्ड देऊन गौरविण्यात आले. तर धनश्री कारळे हिस प्रिन्सि. बॅ. पी. जी. पाटील अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सचिव म्हणाले की, कोरोनाच्या या काळात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन रोझ प्रकल्पद्वारे ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहचलो आणि शिक्षण दिले. रोजगार, कारखानदारी, विद्यार्थी यांची वाताहत झालेली पाहत बसणे योग्य नाही. काळ कसाही आला तरी जगायचे, शिक्षण घेणे थांबवून चालत नाही. शिक्षणाची जबाबदारी केवळ शिक्षकाची नाही, पालक आणि विद्यार्थ्यांची देखील आहे. गरिबीत जन्म झाला तरी गरिबीत राहणे हे चुकीचे आहे. त्यासाठी आभासी दुनियेत न रमता आपण आत्मविश्वासाने वाटचाल करावी. काम करणे आणि शिकणे ही आपली फ्रेम आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणसाने मोठमोठे पराक्रम केले. इंग्रजीची भीती आपण बाळगता कामा नये. मुली आज मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. त्या तुलनेने मुले कमी आहेत. घरात पालकांनी आपली मुले व मुली यांचेशी नाते चांगले ठेवावे. मुलांचे मित्र व्हावे. जेवण करतेवेळी टीव्ही बंद करा आणि आपल्या मुला-मुलींचे विश्व समजून घ्या. मुलांनीही आई वडिलांना अभिमान वाटेल अशीच कामगिरी करावी, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर म्हणाले की, विद्यार्थी हा महत्वाचा घटक असून त्यांचे गुण समजून घेणे हे महत्वाचे आहे. गुण ग्राहकतेने विद्यार्थ्यांचा गौरव केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रोशनआरा शेख यांनी केले. गुणवंत विद्यार्थी यादीचे वाचन डॉ. सुभाष कारंडे यांनी केले तर आभार शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रमसिंह ननावरे यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन प्रा. गजानन चव्हाण व प्रा. साधना पाटील यांनी केले. या समारंभास गुणवत्ता हमी कक्षचे प्रोफेसर डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने देशमुख, प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे, प्रा. गणेश पाटील, इत्यादीसह सर्व प्राध्यापक, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng