औद्योगिक वसाहतीतील अनुप ओमप्रकाश डाळ्या यांच्या गोदामात सोयाबीनचे बोगस बियाणे १०२२ क्विंटलच्या मुद्देमालासह साहित्य जप्त येथील दोन कोटी रुपयांच्या बोगस बियाणे प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद, मात्र पुढील कारवाई गुलदस्त्यात, जनतेत संभ्रम.
सातारा ( बारामती झटका )
सातारा येथील औद्योगिक वसाहतीतील ओमप्रकाश डाळ्या यांच्या गोदामात सोयाबीनचे बोगस 1022 क्विंटल बियाण्यांसह मुद्देमाल जप्त करून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविराज कदम यांनी तक्रार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे तपास आहे. दोन कोटी रुपयांच्या बोगस बियाणे प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद होऊन सुद्धा कृषी विभाग व पोलीस स्टेशन यांचेकडून पुढील कारवाई गुलदस्त्यात असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
सातारा येथील औद्योगिक वसाहतीत दोन कोटी रुपयांच्या बोगस बियाणे प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केलेला होता बुधराव राकेश दवंडे रा. गंज बेतुल, मध्य प्रदेश व कंपनी प्रतिनिधी अमित दिवाण अशी त्यांची नावे होती. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविराज कदम यांनी याबाबत फिर्याद दिलेली होती.
गेल्या आठ दिवसापूर्वी औद्योगिक वसाहतीतील अनुप ओमप्रकाश डाळ्या रा. उत्तेकरनगर सातारा यांच्या गोदामाची तपासणी केली सोयाबीन बियाणे चाळणी लावून 25 किलोच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग व टॅकिंग होत असल्याचे आढळले बॅगेवर उत्पादक व विक्रीसाठी सुंदरम इंटरप्राईजेस प्रा. लि. मेकॅनिक चौक, माता मंदिर जवळ, गंजबैतूल मध्यप्रदेश असा मजकूर छापलेला आढळला. त्याचबरोबर तेथे 25 किलोच्या 1 हजार 916 बॅगमध्ये 479 क्विंटल बियाणे आणि गोणपाटाच्या 50 किलोच्या 1 हजार 86 बॅग आढळून आल्या. त्यात 543 क्विंटल सोयाबीन होते. 1 हजार 22 क्विंटल सोयाबीनचे बोगस बियाणे कृषी विभागाला आढळले.
सदर सोयाबीनची किंमत 2 कोटी 4 लाख 40 हजार रुपये आहे. मजकूर छापलेल्या 520 बॅग, 470 लेबल्स, दोन शिलाई मशीन, एक वजन काटा, बियाणे प्रोसेसिंग मशीन आढळली होती. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, विभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ व रविराज कदम यांनी कारवाई केलेली होती.
सदरच्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे आहे. कृषी विभाग व पोलिस प्रशासनाची कारवाई अद्याप गुलदस्त्यात असल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाली आहे.
कृषी विभागाचे जबाबदार अधिकारी उपस्थित असताना सर्व बोगस बियाणांचे मुद्देमाल असल्याने सदरचे लायसन्स पहिल्यांदा रद्द करावे, अशी सर्वसामान्य शेतकरी बांधवांची इच्छा आहे. कृषी विभागाने कारवाईचा फार्स करून शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वतःचे आर्थिक हित जास्त महत्त्वाचे वाटत आहे का ? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng