सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चहाने सदाशिवनगर पंचक्रोशीतील नागरिकांची तलप भागवून उत्साह वाढवला.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना स्थळावर शेती महामंडळाच्या गाळ्यामध्ये पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चहाने सदाशिवनगर पंचक्रोशीतील नागरिकांची चहाची सलग भागवून आळस झटकून उत्साह वाढविला जात आहे. चहाच्या चवीने दिवसेंदिवस सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चहाला मागणी वाढत आहे.

सदाशिवनगर येथील शेती महामंडळाच्या गाळ्यामधील पुणे-पंढरपूर रोडवर दादा धायगुडे यांनी निम्म्या गाळ्यामध्ये सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रेंचशी घेतलेली आहे. पिता पुत्र दोघेही चहाच्या ठिकाणी असतात. सदाशिवनगर पंचक्रोशीतील व्यापारी व गाळेधारक यांना सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चवीने वेड लावलेले आहे. पिता-पुत्र कोणत्याही ठिकाणी ऑर्डर आली कि, लगेच ऑर्डर घेऊन हजर असतात. ग्राहकांना जास्त वेळ ताटकळत बसावे लागत नाही. सदाशिवनगर साखर कारखाना सुरू झालेला असल्याने कारखान्याच्या ऊसतोड कामगार, मजूर वाहनधारक यांचा दैनंदिन संबंध येत असतो. कारखान्याकडे ऊस घातलेले ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचेही कारखान्यांमध्ये ये-जा सुरू असते. नेहमी आसपासच्या आठ ते दहा गावातील लोक सदाशिवनगर येथे कोणत्याही कारणाने येत असतात. अशावेळी अंगामधील थकवा घालवण्यासाठी सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चहाचा आस्वाद घेत असतात. अनेक गाळेधारक व व्यापारी फोन करून दादा धायगुडे यांच्या चहाचा आस्वाद घेत असतात. दादा धायगुडे यांचा मोबाईल नंबर 91 46 47 21 असा आहे. ज्यांनी सातारा राजधानी सेंद्रिय गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला नाही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथील कॉलेजमध्ये फायर सेफ्टी कोर्स करा शंभर टक्के नोकरी मिळवा
Next articleशिंदे सरकारचा नवा धक्का – विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची नवी यादी पाठवणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here