सामाजिक कामात अग्रेसर राहणार – राजेंद्र बारकुंड

करमाळा (बारामती झटका)

समाजाची सेवा करत व समाजातील दुर्लक्षित घटकाला मदतीला धावून जाणे हेच आता जीवनाचे उद्दिष्ट असून इथून पुढील काळात समाजसेवेला प्राधान्य देणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी सत्काराला उत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली.

राजेंद्र बारकुंड यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दादा थोरात, शिवसेना डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कारंडे, करमाळा शिवसेना उपशहर प्रमुख नागेश गुरव, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजेंद्र बारकुंड यांनी दरवर्षी चिकलठाण परिसरातून शैक्षणिक गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा कार्यक्रम घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना उसाच्या तोडणीसाठी अनेक कारखान्याशी चांगले संबंध ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देतात. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम पाहत असताना त्यांच्या हातून संपूर्ण तालुक्यात विकासकामे झाली आहेत.

आज दिवसभर त्यांच्या सत्कारासाठी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी गर्दी केली होती. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, आता इथून पुढे राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्व देणार असून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार येणार असल्याचे सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगुप्तलिंग घाट करण्यासाठी फडतरी ग्रामस्थ आत्मदहन करणार – प्रा. दुर्योधन पाटील
Next articleमहाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघात प्रथमच माळशिरस तालुक्याला डच्चु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here