सामाजिक कार्यकर्ते युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांचा शालेय विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम.

प्रशाला समिती सदस्या श्रीमती सत्यभामा भोंगळे यांनी समाज उपयोगी सामाजिक कार्य करणाऱ्या युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांचा सन्मान केला.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदाशिवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांनी कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर येथील पाचवी ते बारावी मधील गरीब व गरजू विद्यार्थिनींना 25 गणवेशाचे वाटप केले.

प्रशाला समिती सदस्या श्रीमती सत्यभामा भोंगळे, प्राचार्य देठे सर, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देशमुख साहेब, वस्ताद नारायण सालगुडे पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, उदय पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, प्रशाला समिती सदस्य, कर्मवीर बाबासाहेब विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह सदाशिवनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांची परिस्थिती बेताची आहे. आपण समाजामध्ये जन्माला आलेलो आहे आपण समाजाचे देणे लागतो, हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून समाजातील हुशार व गरजू विद्यार्थिनींना गणवेश देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. प्रशाला समिती सदस्या श्रीमती सत्यभामा भोंगळे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांचा सन्मान केला. उपस्थित सर्वांनी देखील या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज उपजिल्हा रूग्णालयाचे नवीन वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महेश गुडे यांचा सत्कार.
Next articleइनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्रद्धा जवंजाळ तर सचिव पदी डॉ. अर्चना गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here