सारथी व एमकेसीएल तर्फे मराठा समाजासाठी संगणक पदविका कोर्स मोफत

माळशिरस (बारामती झटका)

मराठा कुणबी युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी सारथी व एमकेसीएल यांच्या माध्यमातून सीएसएमएस छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण हा मोफत अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. अशी माहिती एमकेसीएलचे अधिकृत सेंटर लोणकर कॉम्प्युटर, अकलूजचे समन्वयक संदीप लोणकर यांनी केले आहे.

सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम अंतर्गत ‘सीएसएमएस’ या रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास प्रारंभ झाला आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या वर्गातील तरुणांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील एमकेसीएलचे अधिकृत सेंटर लोणकर कॉम्प्युटर यांना हा कोर्स घेण्यास मान्यता मिळाली आहे.

तरुणांची रोजगार क्षमता व स्वयंरोजगार क्षमता वाढविणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विशिष्ट डिजिटल कौशल्ये, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवून स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधीसाठी तरुणांना विकसित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे ४ मॉड्यूल असतील. कार्यक्रम कालावधी ४८० तासांचा असून, सहा महिन्यांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

आवश्यक पात्रता अशी
नोंदणीच्या तारखेस उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असावे‌.
उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.
आई-वडील, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र आठ लाखांपेक्षा कमी असावे.
महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र, तसेच ‘सारथी’ने नमूद केलेली वैध कागदोपत्री पुरावे सादर करावे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअमित ठाकरे यांना मनसे नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली भेट
Next articleवर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here