भांबुर्डी ( बारामती झटका )

सार्थक नर्सरी अँड गार्डन डेव्हलपमेंट भांबुर्डी येथील होतकरू कष्टाळू युवकांने सुरू केलेल्या सार्थक नर्सरी अँड गार्डन डेव्हलपमेंट चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सचिन लामकाने सर, रो. सोनाली सोनाज, रो. संयुक्ता दोशी, सोमनाथ वाघमोडे, बाळासाहेब सरगर, दादासाहेब पांढरे, सरपंच दादासाहेब वाघमोडे, अमीर मुलाणी, अमोल पाटील, पाचपुंड सर, भंडारे सर, पत्रकार एल. डी. वाघमोडे, कैलास वामन, रशीद मुलाणी, रोटरी क्लब ऑफ सराटी डीलाईट व आपलं झाड फाऊंडेशनचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलेल्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय नेतेमंडळींनी येऊन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा उद्योजक दादासाहेब वाघमोडे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng