माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महा विकास आघाडी सरकारमधील विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांना आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ,सुप्रसिद्ध विधि तज्ञ ॲड. एम. एम. मगर यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांना ॲड.एम.एम. मगर यांच्या वतीने 28 ऑक्टोंबर वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षामध्ये तळागाळापासून काम करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत दैदिप्यमान भरारी घेतलेली आहे. काँग्रेस पक्षामध्ये काम करीत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वर प्रभावित होऊन काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत केलेले आहेत.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढवून सर्वसामान्य माणसाला काँग्रेस पक्षामध्ये सामील करण्यासाठी ॲड. एम.एम .मगर यांनीही भरीव कार्य केले होते अशोकराव चव्हाण आणि एम.एम. मगर यांचा राजकीय दोस्ताना होता, राजकीय सलोख्याचे संबंध होते राजकारणाच्या पलीकडे एम.एम. मगर आणि ना.अशोकराव चव्हाण यांचे नातेसंबंध अधिक दृढ झालेले आहे वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता सच्चा मित्र व नातेवाईक या नात्याने एडवोकेट एमएम मगर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त फोनवरून व सोशल मीडियावर शुभेच्छा दिलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng