अकलुज पोलीस स्टेशनने कारवाई केली नसल्याने भारतीय दलित महासंघाचे प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु…
अकलूज (बारामती झटका)
मोजे माळेवाडी बोरगावचे रहिवासी आबासाहेब नारायण पिसे आणि जयराम नारायण पिसे यांचे गट 148 मध्ये 90 आर शेत जमिनिमधील खुल्या जागेमध्ये 7 खोल्या पक्के बाधकाम तसेच शौचालय, पत्राशेड, गायगुराचा गोठा ही लाखो रुपयांची मालमत्ता सालगडी व नोकर विठ्ठल नामदेव एकतपुरे आणि भिमराव नामदेव ऐकतपुरे यांनी बेकायदेशीररित्या बळकावली आहे.
सदरची जागा बळकावून पुन्हा वहीवाटीस रस्ता देत नाही, म्हणुन पिसे यांच्या ऊसाच्या उभ्या पिकामधुन ट्रॅक्टर ट्रॉली घालुन बेकायदेशीर रस्ता तयार करण्याचा प्रयत्न एकतपुरे यांनी केला आहे.
दमदाटी, मारहाण व दंडकशाही करुन दिवसाढवळ्या लाखो रुपयांची मालमत्ता बळकावली असताना अकलुज पोलीस स्टेशन यांनी महसुल व ग्रामपंचायत यांच्या मार्फत स्थळ पहाणी पंचनामा न करता मुळ गुन्ह्यास बगल देऊन साधी NCR फीर्याद दाखल केली आहे. अद्याप आरोपींवर तसेच ट्रॅक्टर चालकावर कोणतीही कारवाई केली नाही.

पिसे कुटुंबियाचे हक्काचे घर न मिळाल्याने दि. 10/5/2022 रोजी अकलुज प्रांत कार्यालयासमोर संस्थापक संजिवदादा खीलारे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सो. जि. अध्यक्ष विकासदादा कसबे, प. म. सचिव राजाभाऊ सकट, सो. जि. उपा. राजाभाऊ मदने, माळशिरस तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खंडागळे, माळशिरस तालुका सचिव दिगंबर साठे यांच्या नेतृत्वाखाली आबासाहेब नारायण पिसे व जयराम नारायण पिसे हे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.
यावेळी विनायक पिसे, कुंदन पिसे, तानाजी पिसे, हनमंत पिसे, सुभाष पिसे, युवराज पिसे, संतोष म्हेत्रे, निलेश म्हेत्रे, सुरज पांढरे, महेश पिसे, शशी पवार, सिताराम मदने आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng