साहित्य समाजमनाचा आरसा आहे – सुनेत्रा पवार

बारामती (बारामती झटका)

साहित्य हाच खरा समाजमनाचा आरसा आहे, असे उद्गार एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मराठी साहित्य प्रज्ञा मंचच्या एकदिवसीय कवी संमेलनाच्या निमित्ताने व्यक्त केले.दि. ५ जून २०२२ रोजी बारामती येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे एकदिवसीय राज्यस्तरीय कवी व गझल संमेलनाचे आयोजन डॉ. शैलेंद्र भणगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात ढोल तुतारीसह, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर साहित्यिकांनी उत्साहात भाग घेतला होता. त्यासोबतच वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. ५ तारखेला पर्यावरण दिनाचे औचित्य साधत या साहित्य संमेलनाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. संयोजकांच्या या कृतीचे सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले व उद्घाटक या नात्याने राज्यभरातून आलेल्या सर्व साहित्यिकांचे स्वागत केले. साहित्यिकांनी समाजातील दु:ख व वेदना आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मांडाव्या, अशी अपेक्षा सौ. पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कथा लेखक प्रा. विजय काकडे यांच्या “कथा वास्तवातल्या भाग – २” व परशूराम लडकत यांच्या “बहर” या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. भरत शिंदे, नेहा किशोरकुमार शहा, सचिन सातव, डॉ. संजय मोकाशी, कवी हनुमंत चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात बहारदार कवी संमेलन पार पडले. यात सुनिता कपाळे, विठ्ठल घाडी, शंकर कदम, मनिषा पाटील, मानसी वाठारे, प्रतिभा विभूते, रेवती साळुंके, नितिन नाळे, करुणा कंद इत्यादी ८० कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी सर्व कवींना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी प्रज्ञा साहित्य मंचच्या संस्थापक प्रज्ञा सुरेश ढमाळ यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विजय काकडे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस पंचायत समिती येथे शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleचि.सौ.कां. शुभांगी चांगण, नातेपुते आणि चि. संकेत काटकर, भोर यांचा शाहीविवाह संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here