कणकवली ( बारामती झटका )
कणकवली-मालवणी महिला दशावतार, महिला सक्षमिकरण, सांस्कृतिक विषयक कार्यक्रम अशा विविध क्षेत्रात कार्य करणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सिंधुरत्न फाऊंडेशनच्या महीला पदाधिका-यांचा नुकताच तेली आळी, कणकवली येथे जनजागृती सेवा समितीच्यावतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्या अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या सत्कार समारंभात अमिता राणे, श्रध्दा पाटिल, मिनल पाटिल, अर्चना राणे, दिपा परब, साक्षी आमडोस्कर, मयुरा भंडारे, सुप्रिया पाटिल, सरिता पाटिल, अनिषा राऊळ, अमिता राणे-दळवी, निलम सावंत-पालव, गौरी पवार, अनुराधा निग्रे, धनश्री लाड, पल्लवी कोकणी, नुपूर पवार, लक्ष्मी गवस, जान्हवी परब, प्रभात पाताडे, स्नेहल तांबे अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचा अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रमुख पाहुण्या अक्षता कांबळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी समाजसेविका निलम सावंत-पालव यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा, अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व व तो कसा व केव्हा सुरु झाला, महिलांची मानसिकता व कार्यपद्धती या विषयावर विस्तृत विवेचन केले. हा सत्कार सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक परब, गंधाली तिरपणकर, प्राची तिरपणकर, वेदांत तिरपणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng