सिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत “विधीलेख” या महिला दशावतार नाटकातील कलावंतांची सदिच्छा भेट

कणकवली (बारामती झटका)

कोकणात दशावतार ही कला लोकप्रिय आहे. त्याहुनही महिला दशावतार कला सादर करण म्हणजे नाविन्यपूर्ण अदाकारी. “विधीलेख”या महिला दशावतार नाटकातील कलाकार कणकवलीत आले असताना त्यांनी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांची तेली आळी, कणकवली येथे सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी गुरुनाथ तिरपणकर व सौ.गंधाली तिरपणकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ‘विधीलेख’ महिला दशावतार नाटकातील अनुज कांबळी, सुप्रिया पाटील, अनिशा राऊळ, मानसी कांबळे, शिवानी डिचोलकर आदी कलाकार उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपनवेल येथील सभेत पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा..!
Next articleश्रीपूर येथे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या किरण नवगिरेचा आज जंगी सत्कार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here