सिनेअभिनेत्री आर्या घारेच्या शुभहस्ते सैराटफेम रिंकू राजगुरू च्या उपस्थितीत उद्योजक दत्तात्रय शेळके यांना पुरस्कार प्रधान.

महाराष्ट्रातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा जयसिंह मोहिते पाटील, सिनेअभिनेत्री कु.रिंकू राजगुरू, कु. आर्या घारे यांच्या उपस्थितीत संपन्न.


अकलूज ( बारामती झटका )

गुरसाळे गावचे थोर सुपुत्र, उद्योजक दत्तात्रय शेळके यांना मास्टरदीप इन्स्टिट्यूटच्या वतीने उद्योग क्षेत्रात गगन भरारी घेतल्याबद्दल बेस्ट उद्योजक पुरस्कार सिनेअभिनेत्री कुमारी आर्या घारे यांच्या शुभहस्ते प्रधान करण्यात आला यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू डॉक्टर वसुंधरा नंदकुमार देवडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्रातील शून्यातून विश्व निर्मिती केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा रविवार दिनांक 31 ऑक्टोंबर 20 21 रोजी दुपारी दोन वाजता अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टी फंक्शन हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमांमध्ये उद्योग क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केलेले यशस्वी उद्योजक दत्तात्रय शेळके यांनाही पुरस्कार देण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा.
Next articleउघडेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर तिघां नराधमांकडून बलात्कार, वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here