सिबील व कृषी पत आणि मर्यादा – मंडल अधिकारी सतीश कचरे

नातेपुते ( बारामती झटका )

कृषि विभाग, केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना बँक कर्ज निगडीत राबवित असते. तसेच शेतकरी बंधूना शेती व शेतीसंबंधी उपक्रम, उद्योग, शेती सुधारणा, आधूनिक तंत्रज्ञान व आधूनिक मशिनरीसाठी बँक कर्जाची गरज असते. साधे पीक कर्ज अल्प मुदतीचे ते दिर्घ मुदतीचे कर्जासाठी शेतकरी बांधवांना बँक व इतर कर्ज देणाऱ्या संस्थाची गरज भासते व लागते. यासाठी शेतकरी बांधव व भागीदारी यांचा सिबील रिपोर्ट व सिबील स्कोअर तपासला जातो व तो ७५० च्या वर – ९७% पर्यंत असेल तरच कर्ज पत व मर्यादासाठी विचार केला जातो.

सिबील ही भारतीय क्रेडीट रेंटीग करणारी संस्था आहे व तिचे नांव क्रेडीट इन्फॉमेशन ब्युरो ऑफ इंडिया लि. असे असून तीची स्थापना २००० साली झाली. सर्व प्रमुख बँक व गैर बँकिंग वित्तीय संस्था यांचेशी सलग्न असून कर्ज पत व मर्यादासाठी या संस्थेचा म्हणजेच सिबील क्रेटीड रिपार्ट व क्रेडीट स्कोअर महत्वाचा आहे. सिबील प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक भागीदारी फर्म, प्रोप्रायटरी फर्म, खाजगी व सार्वजनिक संस्था यांचे कर्ज माहिती विश्लेषण करून पत महिती पुरवते त्याला क्रेडीट रिपोर्ट – बँक कडून घेतलेल्या कर्ज परतफेड इतिहास व क्रेडीट स्कोअर व्यक्ती फर्म किंवा कंपनी यांची क्रेडीट पात्रता दर्शविणारी तीन अंकी संख्या ३०० ते ९०० पर्यंत दर्शविते. या महितीद्वारे सतीशराव कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांचेकडून आवाहन करण्यात येते की, बँक व इतर संस्थामधील क्रेडीट रिपोर्ट व क्रेडीट स्कोअर वाढविणेसाठी कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे, कर्जाची थकबाकी न ठेवणे, क्रेडीट मर्यादा जास्तीत जास्त ३० % वापरणे, गरजेनुसार अत्यावश्यक वेळीच क्रेडीट कार्डचा वापर करणे, कमी प्रमाणात गरजेनुसार आवश्यकतेनुसार वैयक्तिक कर्ज घेणे, भागीदारी व जामिनदार योग्य त्या व्यक्तिची व संस्थेची करणे, वरील बाबीचा तत्वाचा अवलंब केला तर शेतकरी बांधवांना बँक कर्ज निगडीत अनुदान घेण्यास पात्र होतील. शेती व शेती संबंधी उद्योग उदा. प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग, स्मार्ट प्रकल्प, NSB फलोत्पादन प्रकल्प, फार्म मशिनरी, शेती सुधारणा कृषिपुरक उद्योग, गोडावून औजार बँक, ग्रीन हाऊस, समाईक शेततलाव, औजारे इत्यादीना बँक कर्ज निगडीत प्रकल्प उभारणीने अनुदान देणे शेतकरी बंधूना सोईचे होईल. बँकाबरोबर बाजार, बाजारपेठ, व्यापारी, नातेवाईक, मित्रमंडळी, कृषि निविष्ठा विक्रेते, मशिनरी विक्रेते, आत्तेष्ट मधील व्यवहार चोख ठेवून सिबील स्क्रोअर ६५० ते ७५० ठेवून क्रेडीट पात्रता सिद्ध करणे काळाची गरज आहे. यासाठी शेतकरी बंधूनी क्रेडीट पात्रता ‘ क्रेडीट स्कोअर क्रेडीट रिपार्ट सुधारणा व वाढविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून शेती क्षेत्रातील जोखीम कमी करावी असे आवाहन सतीश कचरे मंडल कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांची पंचायत समितीवर प्रशासकपदी नियुक्ती.
Next articleदेर आये दुरुस्त आये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here