पुणे ( बारामती झटका )
आज दि.25/09/2021 रोजी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथील सिम्बॉयसिस सेंटर फॉर हेल्थ स्किल्स येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सायन्सचा इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी यांनी सांगितले की ,कोणतीही पॅथी / शास्त्र कितीही चांगली असली तरी प्रत्येक शास्त्राला काही मर्यादा, फायदे तोटे आहेत परंतु ज्यावेळेस जीवन-मरणाचा प्रश्न येतो त्यावेळेस कोणतीही पॅथी न पाहता रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी पीजीडीईएमएस सारख्या प्रशिक्षणाची अत्यंत नितांत गरज असून मृत्युदर कमी करायचा असेल तर चांगले व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे आणि हाच धागा पकडून सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आदरणीय डॉ. मुजुमदार सर यांनी 2015 साली पी जी डी ई एम एस कोर्स महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सिम्बॉयसिस युनिवर्सिटी येथे सुरू केला व आमच्या आयुष डॉक्टरांना योग्य व चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले त्यामुळे भारतभर हजारो आयुष डॉक्टर्स सध्या या ज्ञानाचा वापर करत समाजसेवा करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

यावेळी डॉ.राजीवजी येरवडेकर (डीन सिम्बॉयसिस सेंटर फॉर हेल्थ स्किल्स) , डॉ.प्रसादजी राजहंस ( संस्थापक पीजीडीईएमएस कोर्स महाराष्ट्र राज्य) , डॉ.परागजी ऋषीफाटक (डायरेक्टर सिम्बॉयसिस सेंटर फॉर हेल्थ स्किल्स), डॉ. बाळकृष्ण गायकवाड (सदस्य कार्यालयीन कामकाज समिती महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद मुंबई), डॉ. प्रतिक तांबे (सदस्य कार्यालयीन कामकाज समिती महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद मुंबई), डॉ. अजय तायडे ( जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना),
डॉ. विजय (प्राचार्य सिम्बॉयसिस सेंटर फॉर हेल्थ स्किल्स), डॉ. नटराजन , डॉ. गुणवंत येवला सर (प्राचार्य डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी), डॉ. मोनेश भंडारी व इंडक्शन प्रोग्रॅमसाठी भारतभरातून आलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng