पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने मित्र मंडळाच्या वतीने ह.भ.प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन तर ह.भ.प. लक्ष्मण राजगुरू महाराज यांचे भारुड कार्यक्रम संपन्न…
माळशिरस ( बारामती झटका )
माणसाने जीवन जगत असताना सुखाचे व्यवहार केल्यानंतर सुख लाभ होत असतो. त्याचा आनंद एवढा असतो ती मागे पुढे कुठे पाहिल तिकडे आनंद ही आनंद भरलेला असतो. ज्याच्याशी आपली संगत जर चांगली असेल तर आपल्याला पंगत सुद्धा चांगली मिळते आणि नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीने आपल्या जीवनामध्येहि चांगला फरक पडत असतो, कशाचीही उणीव रहात नाही. ज्यांचे कर्म चांगले असते अशा लोकांना समाजामध्ये मानाचे स्थान असते. परिपूर्ण आयुष्य जगत असताना दैनंदिन व्यवहार चांगले ठेवा असा मौलिक अध्यात्मिक विचार ह.भ.प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज नागपूरकर यांनी माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतमआबा माने मित्रपरिवार कण्हेर व समस्त ग्रामस्थ कण्हेर यांच्यावतीने भव्य किर्तन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अभ्यासपूर्ण कीर्तनामध्ये सांगितलेले होते.

गुरुवार दि. 10/02/2022 रोजी सायंकाळी 07 ते 09 या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण राजगुरू महाराज कण्हेर यांचे भारुड तर रात्री 09 ते 11 या वेळेमध्ये ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज, नागपूर यांचे सुश्राव्य किर्तन कण्हेर येथील हनुमान मंदिर येथे संपन्न झाले. ह.भ.प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज नागपूरकर यांनी किर्तन रुपी प्रस्तुत सेवेसाठी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला होता.
”सुखाचे व्यवहारी सुखलाभ जाला ! आनंदे कोंदला मागेपुढे ||१||
संगती संगती देवासवे घडे ! नित्यनित्य पडे ते ची सांचा ||धृ||
समर्थचे घरी सकळ संपदा ! नाही तूटी कदा कासयाची ||२||
तुका म्हणे येथे लाभाचिया कोटी ! बहू वाव पोटी समर्थाचे || ३|| ”

ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी अभ्यासपूर्ण व रसाळ वाणीने उपस्थित सर्व हरी भक्तांना मंत्रमुग्ध केले होते. ढोक महाराज यांचे भाषेवरती प्रभुत्व, अध्यात्माचा गाढा अभ्यास असल्याने अशा नामांकित कीर्तनकारांचा दुर्मिळ योगायोग असल्याने पंचक्रोशीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोक महाराज यांनी उपस्थित सर्व माता-भगिनी, अबालवृद्ध, तरुण, तरुणी यांनी हात उंचावून टाळी वाजवून मुखाने नामस्मरण करायला लावलेले होते. ह.भ.प. लक्ष्मण राजगुरू महाराज यांनी भारुडाच्या कार्यक्रमातून लोकांचे मनोरंजन करून समाज प्रबोधन केले. त्यांनी कला सादर करीत असताना आपण या गावामध्ये जन्मलो, वाढलो, याचे भान न ठेवता त्यांनी आपली भारूडाची कला चांगल्या पद्धतीने समाजासमोर मांडून लोकांचे दोन तास कसे गेले कळले सुद्धा नाही. यावेळी ह.भ.प. लक्ष्मण राजगुरू महाराज यांनी अतिशय दर्जेदार व सुरेख भारुडाचा कार्यक्रम केला.

यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयवंततात्या पालवे, बबनबापू पालवे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, वस्ताद महादेव ठवरे, ज्ञानदेव लोखंडे, ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, मारुती तेलंगे पाटील, तानाजीराव शिंदे, सुरेश लवटे, आप्पासो टेळे, किंगमेकर तात्यासो वाघमोडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, कुंडलिक सरगर, ह.भ.प. शिवाजीराव तुपे, रेडे गावचे सरपंच आप्पा रुपनवर, गोरडवाडी गावचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, मोरोची गावचे उपसरपंच अनिल सूळ, दलित महासंघाचे उपाध्यक्ष उमाजीआण्णा मिसाळ, कण्हेरचे माजी सरपंच सुभाष माने, बाजीराव माने, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, सोमनाथ पिसे, इंजिनीयर दत्तात्रय गोरड साहेब, शिवाजी माने सर, महादेव करडे, दादासो चव्हाण, नवनाथ माने, संग्राम माने, अशोक माने, पांडुरंग महानवर, होलार समाजाचे नेते नामदेव केंगार, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने, ह.भ.प. लक्ष्मण राजगुरू महाराज, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्याकरिता ज्येष्ठ नेते हनुमंत काळे, जगन्नाथ शिंदे, विठ्ठल शिंदे, राजेंद्र माने, अशोक ठवरे, प्रताप माने, कालिदास रुपनवर, पोपट माने, सुहास माने, बापू माने, शुभम माने, भैय्या माने, सौरभ गुरव, भैय्या गुरव, अशोक माने, कुमार धाईंजे, भाऊ माने, शंकरराव मिसाळ, ओमराजे सुतार पाटील, संतोष माने, ढगे सर, प्रज्योत माने, छायाचित्रकार किरण काळे, गणेश काळे, कीर्तिराज माने, अथर्व माने पाटील आदी कार्यकर्त्यांसह गौतमआबा मित्र मंडळ व भजनी मंडळातील हरी भक्तांनी परिश्रम केले.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांनी लग्न सोहळा, कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान, जागरण व गजी ढोल कार्यक्रम असे अनेक यशस्वी कार्यक्रम केलेले आहेत. सदरचा भव्य किर्तन सोहळासुद्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी केलेला आहे. त्यामुळे कार्यक्रम कोणताही असो गौतमआबा मित्र मंडळ यशस्वी करीत असतात याचा प्रत्यय उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना आलेला आहे. भव्य कीर्तन सोहळ्यामध्ये भव्य स्टेज देण्यात आले होते. कोठेही बसले तरी स्टेजवरील किर्तन व भारुडाचा कार्यक्रम लोकांना ऐकता आला, पाहता आला. विणेकरी, टाळकरी, मृदुंग, आचार्य, गायनाचार्य, यांना प्रशस्त जागा होती. आकर्षक मंडप, महिला मंडळ, पुरुष मंडळी व मान्यवरांना स्वतंत्र बैठक व्यवस्था, सर्व मंडप, लाईट डेकोरेशन, साऊंड सिस्टिम, मंडप कॉन्ट्रॅक्टर आबासाहेब सरगर यांचे होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng