सुनेत्रावहिनी पवार यांच्या साधेपणा आणि सासर, माहेरच्या संस्काराचे आदर्श दर्शन.

बारामती (बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या धर्मपत्नी सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या साधेपणामधून सासर आणि माहेरच्या संस्काराचे आदर्श दर्शन पहावयास मिळत आहे. कर्तबगार उपमुख्यमंत्री यांच्या धर्मपत्नी म्हटल्यावर कासाराने दुकानसुद्धा घरी आणले असते. परंतु, सादगी आणि संस्कार याचे दर्शन सुनेत्रावहिनींनी दाखवून दिले आहे. बारामती येथील भाजी मंडईतील रफीकभाई आतार यांच्या ताजमहल बँगल्स या बांगड्याच्या दुकानात जाऊन बांगड्या भरल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सुनेत्रावहिनी यांचे मूळ माहेर उस्मानाबाद येथील पाटील घराण्यातील आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिणी आहेत. त्यांचा विवाह काटेवाडी बारामती येथील पवार परिवारातील अजितदादा यांच्याशी झालेला आहे. त्यांना पार्थदादा आणि जयदादा अशी दोन अपत्ये आहेत. अजितदादा यांच्यासोबत मुंबई पुणे येथे वास्तव्य करण्याचा योग येतो. मात्र सुनेत्रावहिनींनी ग्रामीण संस्कृतीच्या सासर आणि माहेरचा वसा आणि वारसा कधीही सोडला नाही. डोक्यामध्ये सत्तेची हवा कधीही जाऊ दिली नाही. त्यांनी काटेवाडी ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिलेले आहेत. बारामती टेक्सटाईल्स माध्यमातून देशात नाव केलेले आहे. श्रीमती शारदाबाई पवार, केंद्रीय माजी कृषिमंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्यातून समाजामध्ये नाव असताना सुनेत्रावहिनींनी समाजसेवा व कार्यातून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे.

सासर आणि माहेर दोन्हीही संस्कारित व राजकीय घराणे आहेत. अशा दोन्ही घरांमध्ये सुनेत्रावहिनी यांनी ग्रामीण भागातील जनतेचे संस्कार जपलेली आहेत. त्या बारामती परिसरातील अनेक लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत असतात. पवार घराण्याने उंच शिखराला गवसणी घातली असली तरीसुद्धा जमिनीशी नातं कधीही सोडलेलं नाही‌‌. संस्कार व साधेपणा बाजारात मिळत नाही, तर अंगामध्ये व घराण्यातील संस्कारात असावे लागतात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू.
Next articleराष्ट्रवादीचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्याकडे राजीनामा देणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here