खर्डी (बारामती झटका)
पंढरपूर तालुक्यातील सुपली येथे शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत हनुमान विद्यालय सुपली आणि प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन जागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण याबाबत जागृतीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत दक्षता, जल प्रदूषण थांबवणे, ध्वनी प्रदूषण रोखणे तसेच पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जेचा वापर आदि बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी सुपली ग्रामपंचायतीचे तरुण युवा महिला सरपंच सुहानी यलमर, ग्रामसेविका नीता बनसोडे, मुख्याध्यापक अशोक यलमर आदी मान्यवरांसह सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य प्रिया विभूते, काजल घाटुळे, वामन (बापू) कुलकर्णी, जगन्नाथ गुरव यांच्यासह सुपली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng