स्वर्गीय सीताबाई विठ्ठल राऊत यांचे प्रथम पुण्यस्मरण व स्वर्गीय विठ्ठल पांडुरंग राऊत यांच्या पंचविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील स्वर्गीय सिताबाई विठ्ठल राऊत यांचे प्रथम पुण्यस्मरण ( वर्षश्राद्ध ) व स्वर्गीय विठ्ठल पांडुरंग राऊत यांचे पंचविसाव्या पुण्यस्मरणानिमीत्त शनिवार दि. 23/04/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. संस्थान महाराज मानेवाडीकर, सातारा यांचे सुश्राव्य किर्तन माळशिरस कचरेवाडी रोड बजरंगवस्ती येथे होणार आहे. तरी पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे श्री. अरुण विठ्ठल राऊत, श्री. अर्जुन विठ्ठल राऊत, श्री. सतीश विठ्ठल राऊत, श्री. विजय विठ्ठल राऊत यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. आपणास हस्ते परहस्ते निमंत्रण आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजर चुकीने निमंत्रण देण्यास राहिले असेल तर हेच निमंत्रण समजून मित्र परिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे समस्त राऊत परिवार, माळशिरस यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng