सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांचा गोरडवाडी येथे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.

प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा स्वर्ग बनवणाऱ्या सौ. सजाबाई कर्णवर पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.

स्वर्गीय सौ. सजाबाई यांचे माहेर व सासर गोरडवाडी गावाला पती पोलीस पाटील, मुलगा सोसायटी चेअरमन, सुन गावच्या सरपंच केवळ दुर्मिळ योगायोग.

माळशिरस ( बारामती झटका )

गोरडवाडी ता. माळशिरस येथे स्वर्गीय सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. 12/3/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन माळशिरस म्हसवड रोड, गोरडवाडी नजिक कर्णवर वस्ती, ता. माळशिरस येथे होणार आहे. पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, किर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. मल्हारी बाबा कर्णवर पाटील, सौ‌‌. मंगल व श्री‌. भागवत मल्हारी कर्णवर पाटील, सौ. रंजना व श्री. शशिकांत मल्हारी कर्णवर पाटील, सौ. वैशाली व श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील, आणि समस्त कर्णवर परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

गोरडवाडी येथील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब असणारे साखराबाई यमगर व पांडुरंग यमगर यांच्या घरामध्ये सजाबाई यांचा जन्म झालेला होता. त्यांना एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार होता. सजाबाई यांचा शुभविवाह गोरडवाडी येथील सुसंस्कृत घराणे काशाबाई कर्णवर पाटील व बाबा यशवंत कर्णवर पाटील यांचे चिरंजीव मल्हारी कर्णवर पाटील यांच्याशी झालेला होता. सजाबाई यांचे शिक्षण कमी मात्र व्यवहारज्ञान जास्त होते. माहेर आणी सासर गोरडवाडी असणाऱ्या सजाबाई यांनी कष्टातून आपला संसार फुलविलेला आहे. मुलांना व सुनांना चांगले संस्कार व शिक्षण देऊन समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. सजाबाई यांचे पती 1985 साली गोरडवाडी गावचे पोलीस पाटील झालेले होते. पूर्वीच्या काळी पोलीस पाटील यांच्यावर गावाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे संसाराची जबाबदारी सजाबाई यांच्यावर आलेली होती. त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळलेली आहे. सजाबाई व मल्हारी यांना तीन अपत्य भागवत, शशिकांत, गोविंद. त्यांनीही समाजामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांचे अनुकरण करून समाजामध्ये प्रतिष्ठा मिळविलेली आहे. भागवत यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले‌ प्रतिकूल परिस्थितीत लहान वयातच घरची जबाबदारी त्यांच्यावर आली‌. त्यांनी घरची तीन एकर शेती करत मोलमजुरी केली. काही दिवस माती कामासाठी पनवेल, मुंबई ठिकाणी गेले होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे शशिकांत यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आई-वडिलांच्या सहकार्याने दोन बंधूंनी लहान बंधू गोविंद यांना उच्चशिक्षित करून इंजिनिअर बनवले. दिवसेंदिवस कष्टाच्या जोरावर आर्थिक प्रगती होत गेली. समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत गेली. गोरडवाडी गावच्या पोलीस पाटील पदी पती मल्हारी असताना गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी मुलगा भागवत व गोरडवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सून सौ. मंगल अशी तीन पदे एकाच वेळी योगायोगाने आलेली सजाबाई यांना पाहता आलेली आहेत. दिवसेंदिवस घराची आर्थिक प्रगती होत गेली, जमीन, जागा खरेदी, चार चाकी गाडी, ट्रॅक्टर अशी वाहने दारामध्ये दिसू लागली.

सजाबाई यांनी कष्टातून आपल्या संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. घरामध्ये एकत्रित कौटुंबिक वातावरण आनंदाने गुण्यागोविंदाने सुरू होते. अशा मध्येच सजाबाई यांना 2013 साली गंभीर आजार झाला. सर्व कुटुंबातील सदस्यांनी दवाखाना औषध उपचार केले. मात्र 2018 साली सजाबाई यांची प्राणज्योत मावळली. धार्मिक वृत्तीच्या सजाबाई असल्याने त्यांना सौभाग्य मरण आलेले आहे‌ स्त्रीचे जीवन परिपूर्ण होण्यासाठी लग्न, पुत्र प्राप्ति, मुलांचे लग्न, नातवंडे डोळे भरून पाहणे आणि शेवटी सौभाग्य मरण येणे याला परिपूर्ण जीवन म्हणतात‌. असे परिपूर्ण जीवन सौ. सजाबाई यांना मिळालेले आहे. सजाबाई यांचे चौथे पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे. सजाबाई यांनी आपल्या मुलांवर केलेले संस्कार त्यांच्या पश्चात सुद्धा एकत्रित कुटुंब पद्धतीने आजसुद्धा अस्तित्वात आहे. सजाबाई यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे कर्णवर पाटील परिवार यांचे कडून विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीषा आप्पासाहेब कर्चे पंचायत समितीसाठी प्रबळ दावेदार.
Next articleचाकोरे येथे जागतिक महिला दिन आदर्श जिल्हा परिषद शाळेत उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here