पुणे (बारामती झटका)
ड्रीम फाउंडेशनकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रा. विक्रमसिंह मगर यांना देण्यात आला आहे.
पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 11 मे 2022 रोजी झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
ड्रीम फौंडेशन, सोलापूर तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सोहळा मागील 18 वर्षापासून घेतले जातात. यंदाही ड्रीम फौंडेशन तर्फे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त व भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय समाजरत्न, बसवभूषण पुरस्काराचे आयोजन केले होते.
यावर्षीअकलूज येथील वक्ते, कवी, इतिहास अभ्यासक प्रा. विक्रमसिंह मगर यांना यंदाचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रा. विक्रमसिंह मगर हे गेल्या काही वर्षांपासून व्याख्यानाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार गावोगावी पोहचवत आहेत. कवितांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत.
हम सब एक है, हम सब भारतीय है, हा विचार मांडून तरुणांना जागृत करण्याचं काम करीत आहेत. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना या समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जनसेवा सहकारी बँक पुणेचे चेअरमन मा. राजेंद्र हिरेमठ, राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भातगुनकी यांचे हस्ते प्रा. विक्रमसिंह मगर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng