माळशिरस ( बारामती झटका )
आज गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात मुंबई येथे शिवाजी पार्कवर दिग्गजांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच अनेक मंत्रीमहोदय तसेच चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार उपस्थित होते. अंत्यसंस्कार सुरू असताना पंतप्रधान यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शेजारी शरदचंद्रजी पवार साहेब आसनस्थ झाले. त्यावेळी पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करतेवेळी पायातील बुट काढून बाजूला ठेवला होता. राज्यपालांच्या शेजारी बसलेल्या पवार यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या हातात बुट उचलून घेऊन ते दोन्ही बुट पवार यांच्या पायात स्वतः हजारो उपस्थितांच्या समोर घातले.

ही बाब पाहिली तर साधी वाटेल परंतु, एका दिग्गज वडिलांची एकुलती एक कन्या खासदार असलेल्या मुलीनं वडिलांचं वाढतं वय लक्षात घेऊन त्यांना मदत करणं ही गोष्ट अप्रुप वाटणारी आहे. ‘मुला पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या सुविचाराचा सुखद अनुभव स्वतः राज्यपाल कोशारी यांच्या समोर सर्व देशवासियांना पाहता आला. एकुलत्या एक मुलीचा सार्थ अभिमान शरदचंद्रजी पवार साहेबांना का आहे, हे आज समजले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng