इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिर आणि धार्मिक स्थळं बंद होती. मंदिर व धार्मिक स्थळं कधी खुली करण्यात येणार, याकडे आपल्या सर्वांचे लक्ष लागले होते. कालपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिर व धर्मस्थळं खुले करण्यात आली आहेत. त्यानिमित्ताने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर व मंदिर परिसर स्वच्छताबाबत आज पुणे जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी बावडा येथील पद्मावती मंदिर येथे भेट देत नियोजनाचा आढावा घेतला.
धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसेच स्क्रिनिंगची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत फक्त अशाच व्यक्तींना व ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेले आहे, त्यांनाच धार्मिक स्थळात प्रवेश मिळेल. कालपासून नवरात्री सुरू होत झाले आहे. त्यामुळे हजारो महिला व भक्त पद्मावती मंदिरास भेट देतील, या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना नियोजन योग्यरीत्या झाले आहे का याची अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. तसेच भाविकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng