ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला योग्य व किफायतशीर किंमतीत भव्य कपड्यांचे दालन सुरु…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस शहरामध्ये ओंकार कलेक्शन यांनी ग्राहकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त 999 रुपये मध्ये 3 जीन्स पॅन्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला योग्य व किफायतशीर किंमतीचे भव्य कपड्यांचे दालन श्रेयश हॉस्पिटल शेजारी, जैन मंदिर रोड, माळशिरस येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सपकाळे यांचे चिरंजीव ओंकार सपकाळे यांनी ओंकार कलेक्शन सुरू केलेले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सपकाळे यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. समाजातील जनतेची सेवा करण्याचे काम सुरू आहे.
सध्या फॅशनच्या युगामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेलासुद्धा योग्य दरामध्ये चांगल्या दर्जाची कपडे मिळावीत, या उदात्त हेतूने ओंकार सपकाळे यांनी माळशिरस शहरात ओंकार कलेक्शन भव्य कपड्यांचे शोरूम सुरू केलेले आहे त्यामध्ये साडी, रेडीमेड होजीयरी, शर्ट, टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, चिल्ड्रन्स वेअर असे विविध व्हरायटी असलेले कपड्यांचे भव्य शोरूम उभारलेले आहे. त्यांनी तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त 999 रुपये मध्ये तीन जीन्स पॅन्ट अशी स्कीम राबवलेली आहे. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

सदर ओंकार कलेक्शन यास ज्येष्ठ पत्रकार धनंजय थोरात, बारामती झटका न्यूज चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपकाळे यांनी ओंकार कलेक्शन विषयी माहिती सांगितली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng