सौ. रुक्मिणी व श्री. विठ्ठल यांच्या संस्कारातून घडलेला हरी, असावा प्रत्येकांच्या घरी.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
पुरंदावडे सदाशिवनगर येथील सौ. रुक्मिणी व श्री. विठ्ठल यांच्या संस्कारातून घडलेले, प्रत्येक कार्यातून प्रत्येकाच्या घरी असणारे, सुसंस्कृत आचार, विचार आणि स्वकर्तुत्वाने समाजात वेगळे स्थान निर्माण करणारे, आदर्श घ्यावा असे नेतृत्व असणारे युवा नेते हरिभाऊ विठ्ठल पालवे यांचा आज वाढदिवस. हरिभाऊ यांना बारामती झटका परिवार यांचेकडून वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.
पुरंदावडे सदाशिवनगर येथील सौ. रुक्मिणी व श्री. विठ्ठल संभाजी पालवे हे आदर्श शेतकरी. सर्वसामान्य कुटुंबामध्ये हरिभाऊ यांचा जन्म झालेला आहे. त्यांना श्रीराम हे बंधू आहेत. राम-लक्ष्मणसारखी असणारी जोडी, उंची, रंग, रूप सर्व एकसारखे असणारे, समाजामध्ये दोघांनीही आपली प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे. मारकडवाडी येथील आप्पासाहेब मारकड यांची कन्या व किसन मारकड यांची बहीण रुक्मिणी यांचा शुभविवाह श्री. विठ्ठल पालवे यांच्याशी झालेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत दाम्पत्याने आपल्या मुलांवर संस्कार केले. शेती, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन असे व्यवसाय करून त्यांनी एका मुलाला पोलीस खात्यामध्ये भरती केली आहे. ते सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर मुंबई येथे कार्यरत आहेत, तर हरिभाऊ हे दहावी पास असून शेती व्यवसाय करतात. त्यांना सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड होती. त्यांनी पुरंदावडे येथे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व मित्रपरिवार यांच्या सहकार्यातून अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत. समाजामध्ये कामे करीत असताना लोकप्रतिनिधी यांची गरज असते. सर्वसामान्य जनतेची कामे करण्याकरता लोकप्रतिनिधी मार्फत कामे करण्यासाठी हरिभाऊंनी विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केलेली आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष सदस्या सौ. संगीताताई संजय मोटे यांनाही सहकार्य करून जनतेची कामे केलेली आहेत. सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते काम पाहत आहेत. अनेक लोकांच्या आमदारांच्या सहकार्याने अडीअडचणी सोडविण्याचे त्यांचे काम सुरू आहे.

सुसंस्कृत स्वभाव, आचार विचार आणि स्वकर्तृत्व यामुळे समाजात हरिभाऊ यांनी वेगळी प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे. आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरकृत्य न करता समाजामध्ये ते वागलेले आहेत. शब्दाला पक्का असणारा माणूस, एखादे काम होत असेल तरच समोरच्या व्यक्तीला विश्वास देत असतात, असे विश्वासनीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना फोंडशिरस येथील वाघमोडे परिवार यांच्या घराण्यातील स्वातीताई यांची साथ मिळत आहे. घरामध्ये स्वातीताई यांचा नेहमीच हरिभाऊ यांना आदर्श पत्नी म्हणून कोणत्याही कामात सहभाग असतो. त्यांना त्यांच्याच आचार विचाराचा जयकुमार हा मुलगा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या वाक्याचा प्रत्यय येतो. आपण समाजामध्ये अनेकदा पाहतो कि, मुलं आणि वडील एकमेकांच्या विचारापासून बाजूला झालेले असतात. मात्र श्री. विठ्ठल व सौ. रुक्मिणी यांच्या संस्कारातून घडलेले हरिभाऊ आणि श्रीराम हे दोघे बंधू राम लक्ष्मणसारखे आहेत. हरिभाऊ यांना उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील, संपादक, बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनेल.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng