सेलू येथील नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील नराधमांना कठोरात-कठोर शासन करा – राष्ट्रीय नाभिक संघटनेची मागणी.

परभणी (बारामती झटका)

सेलू ( जि. परभणी) येथील नाभिक समाजाच्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केलेला आहे. हि घटना अतिशय निंदनीय असून पुरोगामी महाराष्ट्राला काळे फासणारी आहे. अशा नराधमांना कठोरात-कठोर शासन व्हावे. तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून मा. उज्ज्वल निकम यांची विविज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात यावी.

या मागणीसाठी राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अकलुज येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष किरण भांगे, तालुकाध्यक्ष राहुल सराटे, विठ्ठल जाधव, मुरलीधर सुरवसे, केशव लोखंडे, धनेश डांगे, बाळासो जगताप, योगेश जाधव, सोमनाथ सपताळ, शिवाजी भांगे, नानासो साळुंखे, सोमनाथ राऊत, अजिनाथ वाघमारे, सुनिल भांगे, सचिन सराटे, अक्षय शिंदे आदी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे युवक पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्राचे माजी दुग्धविकास मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे सरसेनापती महादेव जानकर यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर.
Next articleसुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांचे विझोरी येथे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here