सोमंथळी येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २१ वे राज्यस्तरीय निवासी शिबिराचे आयोजन

सोमंथळी (बारामती झटका)

मौजे सोमंथळी ता. फलटण येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २१ वे राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन दि. १२ व १३ मार्च २०२२ रोजी करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ११ मार्च रोजी श्रीं ची प्रतिष्ठापना, आरती, सत्संग व भोजन असा कार्यक्रम असणार आहे.

शनिवार दि‌. १२ मार्च रोजी श्रींची काकड आरती झाल्यानंतर अखंड जपमाळेस प्रारंभ होणार आहे. याच दिवशी चैतन्य जप प्रकल्प २१ व्या राज्यस्तरीय शिबिराचे उद्घाटन निरावागज, ता. बारामती येथील भाग्यवान जपकार शिवाजी कुंभार यांच्या शुभहस्ते आणि श्री क्षेत्र आळंदी येथील भागवताचार्य ह.भ.प. श्री. माधव महाराज ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. रविवार दि. १३ मार्च रोजी नातेपुते येथील ह.भ.प. देशमुख यांचे निरूपण होणार आहे. तसेच जेजुरी येथील ह.भ.प. आकाश महाराज कामथे यांचे सांप्रदायिक कीर्तन होणार आहे. तसेच पुरोगामी विश्व वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. जयंतजी करंदीकर कुर्डूवाडी यांचे प्रवचन होणार आहे. या शिबीराचा सांगता समारंभ रामायणाचार्य ह.भ.प. दिलीप महाराज झगडे पाडेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सर्व भाविक भक्तांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या सेवेचा व कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष व शिबिर विभाग प्रमुख धैर्यशीलभाऊ देशमुख यांच्या वतीने करण्यात आली आहे.

आपण शिबिराला निवासी येणार असाल तर त्याप्रमाणे आम्हाला एकूण किती लोक (किती पुरुष व किती स्त्रिया) येणार आहात ते त्वरित कळवावे. शिबीर ग्रामीण भागात असल्याने त्यानुसार आम्हाला व्यवस्था करणे सोईचे होईल, असे आवाहन धैर्यशीलभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष व शिबीर विभाग प्रमुख चैतन्य जप प्रकल्प (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचाकोरे येथे जागतिक महिला दिन आदर्श जिल्हा परिषद शाळेत उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा.
Next articleपुणे-पंढरपूर रोड धर्मपुरी बंगला ते दहिगाव रस्त्याचे निकृष्ट कामाची चौकशी करावी – नानासाहेब रणदिवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here