सोमनाथ भोसले यांची आरपीआयच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड – बी. टी. शिवशरण


सोलापूर (बारामती झटका)

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे धुरंधर नेतृत्व राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक कार्यकर्ते सोमनाथ भोसले यांची आरपीआयच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. सोमनाथ भोसले यांनी गेली तीस वर्षे चळवळीत झोकून देऊन प्रामाणिक काम केले आहे. दलित पँथरच्या चळवळीत सहभागी होऊन सामाजिक, राजकीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. मागासवर्गीय लोकांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन असो, गायरान जमिन, शेती महामंडळ, कामगार यांच्या हक्काच्या जागेसाठी प्रयत्न असो किंवा प्राप्त परिस्थितीत निर्माण झालेल्या अडचणी, समस्या, तक्रारी या संदर्भात ते जागृत राहून प्रशासकीय पातळीवर न्यायासाठी संघर्ष करणारे लढवय्ये भिमसैनिक आहेत. दलित चळवळीत अनेक स्थित्यंतरे झाली, गट तट पडले, विभागणी झाली, मात्र, राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहुन रिपब्लिकन पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तो त्यांनी कायम रामदास आठवले व राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या सशक्त खांद्यावर डौलाने फडकवत ठेवला आहे.

सोमनाथ भोसले यांनी आरपीआयमध्ये सामान्य सदस्य ते शहर तालुका पातळीवर सन्मानाने अनेक पदे भुषवली आहेत. सोलापूर जिल्हा सरचिटणीस पद त्यांनी उत्तम सांभाळले आहे. त्याचीच पोचपावती म्हणून राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांनी अक्कलकोट येथे सोलापूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा व जिल्हा कार्यकारिणी बैठकीत त्यांची एकमताने आरपीआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सोमनाथ भोसले यांची आरपीआयच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे नाव सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी राहिले आहे, ही माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभिमानाची व कौतुकाची बाब ठरली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. जागोजागी त्यांचा सत्कार कौतुक सोहळा होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी त्यांना दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील दलित चळवळीतील तरुण कार्यकर्ते आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षात सहभागी कसे होतील, तसेच रिपब्लिकन पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. गट तट संपवून एकत्रीत रिपब्लिकन पक्ष वाढवण्याचा माझा अध्यक्षपदाचा कार्यकाळ राहील. सर्वांना विश्वासात घेऊन, कार्यकर्त्यांना बळ देऊन, पक्षाची ताकद वाढवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कार्य सुरू ठेवण्यासाठी गाव तेथे रिपब्लिकन शाखा हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन पक्षात सर्व घटकांना सामावून घेतले जाईल. केवळ एका विशिष्ट जातीचा रिपब्लिकन पक्ष न ठेवता अन्य जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान देऊन पक्ष व्यापक बनवण्याचा प्रयत्न राहील, अशी त्यांनी ग्वाही दिली. ज्या उद्देशाने माझ्यावर लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांनी विश्वासाने जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे, तो विश्वास सार्थ ठरवीन. माळशिरस तालुक्याचे नाव उज्वल व सार्थ ठरविण्यासाठी तनमनधनाने प्रत्येक पाऊल जपून टाकुन सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कसा करता येईल हे माझे स्वप्न व ध्येय आहे, अशी त्यांनी त्यांची मनोकामना बोलून दाखवली आहे. सोमनाथ भोसले यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून ‘जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा’
Next articleमनसेच्या वर्धापन दिन व महिला दिनानिमित्त १५१ जणांचे रक्तदान..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here