सोलापूर जिल्हा आरपीआयचा स्वाभिमान राजाभाऊ सरवदे श्रीपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते बरोबर मनमोकळ्या गप्पा मारत असताना. – बी. टी. शिवशरण

श्रीपूर (बारामती झटका)


आज दुपारी श्रीपूरचे आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोलापूरला राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी संपर्क कार्यालयात राजाभाऊ सरवदे साहेब यांनी दलित पँथर पासून ते सद्यकालीन रिपब्लिकन पक्ष चळवळीतील आठवणी त्याकाळी चळवळीत काम कसे केले किती अडचणी आल्या पण सर्व अडथळे पार पाडून चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्ते कसे घडले आंदोलन यशस्वी कशी केली यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांनी अनेक जुन्या आठवणी जाग्या केल्या प्रामाणिक व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना त्यांनी कौतुक करून शाबासकी दिली त्याचप्रमाणे चळवळीच्या नावाखाली वैयक्तिक कुणी किती कसा स्वार्थ साधला याची कुंडली मांडली कार्यकर्त्यांनी स्वतः चा विचार जरूर करावा पण समाजातील अडलेल्या नडलेलया गोरगरीब लोकांचा प्रथम विचार करून त्यांच्यासाठी पुढं आलं पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले लोणावळा येथे येत्या चार तारखेला पक्षाची राज्य कार्यकारिणी ची बैठक होणार आहे त्यात नुतन राज्य कार्यकारिणी बाबत विचारविनिमय होऊन नविन कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली सध्या राज्यातील आरपीआयच्या सर्व शाखा तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष व सर पदाधिकारी यांच्या मुदती संपल्या आहेत चार तारखे नंतर नवीन पदाधिकारी कार्यकारिणी निवड होऊ शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यांनी पक्षात योगदान दिलेल्या जुन्या कार्यकर्त्यां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांच्या बरोबर सेहचाळीस वर्षे चळवळीत काम करत असल्याचे सांगितले अतिशय मनमोकळेपणाने निवांत वेळ देऊन ज्येष्ठ कार्यकर्ते बरोबर संवाद साधला यावेळी तुकाराम बाबर बी टी शिवशरण भरत बनसोडे गौतम आठवले अप्पा नाईकनवरे राजू शेंडगे यांनी सहभाग घेतला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय पतसंस्थेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीत संपन्न
Next articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्री विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब माळी यांचे भावनिक पत्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here